Asia Cup 2023: एशिया कप स्पर्धेसाठी 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा, धोकादायक गोलंदाजांचा समावेश

Asia Cup 2023: जगभरातील क्रिकेट प्रेमींना उत्सुकता लागली आहे ती एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची. या वर्षाच्या अखेरीस म्हणजे ऑक्टोबरमध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा  (ODI WC 2023) खेळवली जाणार आहे. पण त्याआधी एशिया कप (Asia Cup 2023) खेळवला जाणार आहे. याच महिन्याच्या शेवटी पाकिस्तानात एशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 30 ऑगस्टला पहिला सामना खेळवला जाणार असून 17 सप्टेंबरला अंतिम सामना रंगेल. यजमान पाकिस्तान आणि नेपाळदरम्यानच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर क्रिकेटप्रेमींना उत्सुकता असलेला भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा सामना 2 सप्टेंबरला होणार आहे.

पाकिस्तान संघाची घोषणा
एशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 17 खेळाडूंच्या पाकिस्तान संघाची (Pakistan Team Annunced) घोषणा केली आहे. या संघाचं नेतृत्वा बाबर आझमकडे सोपवण्यात आलं आहे. हाच संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी खेळणार आहे. एशिया कप स्पर्धेत एकूण 13 खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा यंदा एकदिवसीय फॉर्मेंटमध्ये होणार असून हायब्रिड मॉडेलच्या आधारावर खेळवली जाणार आहे. स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानात तर उर्वरीत 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. 

एशिया कपसाठी ग्रुप
ग्रुप-A: भारत, पाकिस्तान आणि नेपाळ
ग्रुप-B: श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान

Related News

पाकिस्तान संघात धोकादायक गोलंदाज
एशिया कप स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या पाकिस्तान संघात धोकादायक गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या जोडीला हॅरिस राऊफ, नसीम शाह आणि मोहम्मद वसी ज्युनिअर यांना संधी देण्यात आली आहे. तर  बाबर आझम (Babar Azam), इमाम उल हक, मोहम्मद रिझवान अशी तगडी फलंदाजी आहे. 

एशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ
अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर, सऊद शकील, मोहम्मद रिजवान, मोहम्मद हारिस, शादाब खान (उपकर्णधार) , मोहम्मद नवाज, उस्मा मीर, फहीम अशरफ, हारिस रऊफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन शाह आफरीदी.

एशिया कपमध्ये भारताचा दबदबा
एशिया कपचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघाचा दबदबा राहिला आहे. एशिया कपचे आतापर्यंत 15 हंगाम झाले. यात टीम इंडियाने सर्वाधिक 7 वेळे जेते पटकावलं आहे. (1984, 1988, 1990–91, 1995, 2010, 2016, 2018). श्रीलंकेने आतापर्यंत 6 वेळा एशिया कपवर नाप कोरलं आहे. (1986, 1997, 2004, 2008, 2014, 2022)  तर पाकिस्तान संघ दोन वेळा एशिया कपची चॅम्पियन राहिली आहे.  (2000, 2012)

एशिया कपचं वेळापत्रक

30 ऑगस्ट : पाकिस्तान vs नेपाळ – मुलतान
31 ऑगस्ट : बांगलादेश vs श्रीलंका – कँडी 
2 सप्टेंबर : भारत vs पाकिस्तान – कँडी 
3 सप्टेंबर: बांग्लादेश vs अफगाणिस्तान – लाहोर
4 सप्टेंबर : भारत vs नेपाळ – कँडी 
5 सप्टेंबर : श्रीलंका vs अफगाणिस्तान – लाहोरInformation Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *