Asia Cup 2023: ‘सकाळी, दुपारी कितीही IPL खेळा, पण….’ पाकिस्तानी खेळाडूने उडवली भारतीय संघाची खिल्ली

आशिया कप स्पर्धेला अखेर सुरुवात झाली असून, पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा दारुण पराभव केला आहे. पण या स्पर्धेत सर्वांचं लक्ष भारत-पाकिस्तान सामन्याकडे आहे. 2 सप्टेंबरला म्हणजे शनिवारी क्रिकेटरमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी असणारे हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. श्रीलंकेतील कँडी येथे हा सामना पार पडणार आहे. त्याआधी दोन्ही देशातील क्रिकेटतज्ज्ञ आणि माजी खेळाडू समीक्षा करत आहेत. यादरम्यान पाकिस्तानचा माजी फलंदाज सलमान बट याने भारताच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.  

“जर तुम्ही भारताचे जलदगती गोलंदाज पाहिले, तर फिटनेस हा जास्त चिंतेचा विषय आहे. खेळाडू फार काळापासून अनफिट असून त्यांची स्थिती नाजूक आहे की अगदी चांगली याची माहिती नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा वगळता संघात सर्व तरुण खेळाडू आहेत. ते फार सामने खेळले आहेत, पण गरज हवी तितका अनुभव त्यांच्याकडे नाही,” असं सलमान बटने एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

भारताचा विजय हा पूर्णपणे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर अवलंबून असून, इतर खेळाडू गरज असते तेव्हा फार चांगलं खेळत नाहीत असं त्याने म्हटलं आहे. सलमान बटच्या म्हणण्यानुसार, “भारत तेव्हाच सामना जिंकला आहे, जेव्हा रोहित शर्मा चांगला खेळला आहे किंवा विराट कोहलीने एखादी जबरदस्त कामगिरी केली आहे. पण जेव्हा स्थिती वेगळी असती तेव्हा मात्र ते अडचणीत असतात”. 

Related News

सलमान बटने भारतीय संघात सामना जिंकून देणारे खेळाडू आहेत, हे मान्य करताना फलंदाज जास्त भरवशाचे नसल्याचं म्हटलं आहे. तसंच पाकिस्तान संघात वेगवान गोलंदाज असून, भारताकडे त्यांची कमतरता असल्याचं सांगितलं आहे.

“पाकिस्तानकडे बाबर, रिझवान, फखर, शादाब, शाहीन, हॅरिस रौफ असे खेळाडू आहेत. माझ्या मते पाकिस्तानकडे चांगल्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. भारताकडे जडेजा, शामी, बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली असे सामना जिंकून देणारे खेळाडू आहेत. पण त्यांची फलंदाजी फार भरवशाची नाही. जर पाकिस्तानने दोन मोठे खेळाडू बाद केले तर इतरांना फार काही सिद्ध करावं लागणार आहे. त्यांनी एकट्याने भारताला पाकिस्तान किंवा इतर संघांविरोधात विजय मिळवून दिलेला नाही,” असं सलमान बटने म्हटलं आहे. 

“आमच्याकडे ताशी 90 किमीच्या वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. पण भारताकडे फक्त एखादा गोलंदाज असा आहे. ही आमची जमेची बाजू आहे. आमच्याकडे सर्व प्रकारचे जलद आणि फिरकी गोलंदाज आहेत जे 140 च्या वेगाने गोलंदाजी करु शकतात,” असंही सलमान बटने म्हटलं आहे.

सलमान बटने यावेळी आयपीएलचा उल्लेख करत भारताला टोलाही लगावला आहे. “भारताकडून फार अपेक्षा आहेत, त्यामुळे दबावही जास्त आहे. तसंच भारताने गेल्या अनेक काळापासून पाकिस्तानविरोधात सामना खेळलेला नाही. भारतीय खेळाडूंनी कितीही आयपीएल खेळलं असलं तरी अशा अटीतटीच्या सामन्यात खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे नाही. सकाळ, दुपार आयपीएल खेळलात तरी भारत-पाकिस्तानसारख्या हायव्होल्टेज सामन्यात खेळण्याचा अनुभव येत नाही,” असं सलमान बटने म्हटलं आहे.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *