Ind vs Pak, Asia Cup 2023 : क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या वर्ल्ड कपआधी सराव परीक्षा पार पडणार आहे. याचा पहिला पेपर असेल तो 2 सप्टेंबरला… या पेपरमध्ये नापास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण हा पेपर असेल सर्वात आवडत्या विषयाचा म्हणजेच पाकिस्तानचा… आशिया कप (Asia Cup 2023) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे दोन संघ आमने सामने येणार आहेत. त्यामुळे आता बाबर आझम (Babar Azam) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची पुन्हा एकदा टक्कर होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असतानाच आता एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे.
आगामी भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी (IND vs PAK) टीम इंडिया मैदानात घाम गाळताना दिसत आहे. अशातच आता त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानने देखील धास्ती घेतल्याचं दिसतंय. या व्हिडीओमध्ये कॅप्टन रोहित शर्मासह टीम इंडियाचे इतर खेळाडू सराव करताना दिसत आहेत. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर संघाच्या सरावात सामील झाल्याने आता टीम इंडियामध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे.
मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज टीम इंडियाच्या फलंदाजांना आऊट साईड ऑफ गोलंदाजी करत आहेत. तर विराट कोहली पुल शॉटचा सराव करतोय. तर केएल राहुल आणि इशांत किशन किपिंग करताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. सुर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन जास्त व्हिडीओमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे सुर्यकुमार बेन्चवर असणार का? असा सवाल विचारला जात आहे. तर अक्षर पटेल देखील फक्त फलंदाजी करताना दिसतोय. त्यामुळे त्याला वरचा क्रम दिला जाईल की काय? असा सवाल विचारला जात आहे.
Related News
ऋषभ पंतच्या खांद्यावर तो हात कोणाचा होता? अखेर 4 वर्षांनंतर मयंक अग्रवालकडून रहस्याचा खुलासा
World Cup: शेवटच्या क्षणी वर्ल्डकपच्या टीममध्ये 2 मोठे बदल; ‘या’ खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता!
वर्ल्डकप आधी मोठा वाद! रोहितचं उदाहरण देत 25 शतकं झळकावणाऱ्याची संघातून हकालपट्टी
World Cup 2023: ‘आम्हाला सर्वात जास्त…’ भारतात पोहोचताच पाकिस्तान संघाला धास्ती; केली मोठी मागणी
IND vs AUS: रोहित शर्माची एक चूक आणि…; कर्णधाराच्या ‘त्या’ निर्णयाने टीम इंडियावर पराभवाची नामुष्की
कोहलीचा लाबुशेनसह डान्स: मॅक्सवेललाही दिले आलिंगन, रोहितची बुलेट-शॉर्ट हातात अडकल्याने चकित झाला मॅक्सवेल; मोमेंट्स
Rohit Sharma: रोहितने ट्रॉफीला हातही लावला नाही…तर सिराजने 4 अनोळखी खेळाडूंच्या हाती सोपवली विजयाची ट्रॉफी
‘तो तर आमच्या जावयासारखा’; भारतीय क्रिकेटपटूबद्दल शाहरुखच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या
World Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात दाखल, सात वर्षात पहिल्यांदा असं घडलं
IND vs AUS : गोऱ्या स्मिथला ऊन सोसवेना पण कोहलीचं भलतंच चाललंय, Video पाहून तुम्हीही खदाखदा हसाल!
सायन्स ऑफ क्रिकेट : पुल शॉट: रोहित प्रत्येक 5व्या पुल शॉटवर षटकार मारतो, या शॉटमागे विज्ञान काय
विश्वचषकातील वाद: अंपायरची कॅप कशी गायब झाली, अंडरआर्म बॉलिंगवर बंदी; 2011 मध्ये दोनदा टॉस का झाला?
पाहा टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.