आशिया चषकमध्ये आज हाय व्होल्टेज सामना: भारत-पाकिस्तान 11 महिन्यांनंतर पुन्हा आमनेसामने; भारताची अव्वल फळी भक्कम

दिव्य मराठी नेटवर्क | कोलंबो/नवी दिल्ली20 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

आशिया चषकातील सर्वात रोमांचक सामना आज शनिवारी हाेईल. त्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत- पाकिस्तान आमनेसामने असतील. दोघेही ४ वर्षांनंतर एकदिवसीय सामन्यात समाेरासमाेर येतील. याआधी २०१९ च्या विश्वचषकात दोघेही भिडले होते. ते गेल्या वर्षी 23 ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषकातही खेळले होते. केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि बुमराह दुखापतीतून सावरले आहेत. कर्णधार रोहित शर्माने २०१८ मध्ये आशिया कपचे विजेतेपदही पटकावले आहे. अशा स्थितीत भारताची बाजू वरचढ दिसते.

Related News

आशिया चषकातील १३ लढतींमध्ये भारताने ७ जिंकल्या, पाकने फक्त ५

•132 एकदिवसीय भारत-पाक लढतींपैकी ५५ भारताने ७३ पाकने जिंकल्या. ४ अनिर्णित राहिल्या.

•13 वनडे दोन्ही संघ आशिया कपमध्ये खेळले. भारताने ७, पाकने ५ जिंकले. १ अनिर्णित राहिला.

•3 वनडे दोघांनी श्रीलंकेत खेळले. दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकला, १ अनिर्णित राहिला आहे.

•10 गेल्या एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने ७ आणि पाकिस्तानने ३ सामने जिंकले आहेत.

भारताच्या या पाच फलंदाज आणि गोलंदाजांच्या कामगिरीकडे असेल लक्ष

रोहित शर्मा शाहीन शाह आफ्रिदी

रोहितने गत आशिया कपमध्ये आफ्रिदीच्या चेंडूवर १९ चेंडूत १८ धावा केल्या. पाकविरुद्ध दोन सामन्यांत शतके झळकवली.

बाबर कुलदीप

​​​​​​​बाबरने २०२३ मध्ये १२ सामन्यात ५७ च्या सरासरीने आणि दोन शतकांच्या मदतीने ६८९ धावा केल्या. कुलदीप त्याची कमकुवतता आहे. ताे कुलदीपकडून तीन डावांत दोनदा बाद झाला.

हार्दिक पंड्या, शादाब खान

हार्दिक आणि शादाब मधल्या षटकांमध्ये भिडतील. हार्दिकने २२ चेंडूत २०९ च्या स्ट्राईक रेटने ४६ धावा केल्या आहेत.

विराट कोहली हॅरिस राैफ

​​​​​​​टी-२० विश्वचषकात विराटने रौफविरुद्ध ४ डावात १३१.२५ च्या स्ट्राइक रेटने ४२ धावा करत वर्चस्व गाजवले आहे.

जसप्रीत बुमराह फखर जमां

​​​​​​​फखरच्या नावावर बुमराहविरुद्ध ४ डावात ४५ चेंडूत २५ धावा करण्याचा विक्रम आहे बुमराहने वनडेमध्ये त्याला बाद केलेले नाही.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *