Asia Cup : ये बाबूभैया का स्टाईल है रे बाबा! विराट कोहलीचा फनी वॉक व्हायरल; पाहा Video

Virat kohli, Asia Cup 2023 : मनावर आणि डोक्यावर कोणतंही प्रेशर नसलं की मनसोक्त जगता येतं. हल्लीच्या काळात लोकं सगळं करतात पण जगणं मात्र विसरतात. अडचणी असो वा टेन्शन, सर्वांना दु:ख समान असतं. मात्र, या सर्वांना बाजूला ठेऊन मनमोकळं जगलं पाहिजे, अगदी विराट कोहली (Virat Kohli) सारखं… संघातून टावललं जाण्याची चिंता.. तसेच सामन्यात धावांची असणारी अपेक्षा.. या सगळ्यातून विराट कोहली मात्र बिनधास्त वावरताना दिसतो. त्यामुळेच कदाचित विराट कोहलीने नावलौकिक मिळवलंय. सध्या विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ (Viral Video) पाहून अनेकांच्या चेहऱ्यावरचं हसू खुललं आहे.

आग लगे बस्ती मैं, कोहली अपनी मस्ती मैं… असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विकेट कोणत्याही गोलंदाजाला असो, सिलेब्रेशन मात्र विराटचंच असतं. विराट कोहली अन् ऑन फिल्ड मस्ती याचं नात जणू आता पक्कं झालंय. दोन दिवसाखाली झालेल्या भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यात विराटला आराम दिला होता. त्यावेळी विराट वॉटर बॉल बनला. त्यावेळी विराटने हेरी फेरी स्टाईलने मैदानात एन्ट्री केली अन् सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अशातच आता विराटचा आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये विराट बाबूभैयाच्या स्टाईलमध्ये वॉक करताना दिसतोय.

आणखी वाचा – मोहम्मद सिराज वेगळ्याच धुंदीत, सामन्यात असं काही केलं की… विराट देखील पोटधरून हसला; पाहा Video

Related News

झालं असं की, आशिया कपमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा लाजीरवाणा पराभव केला. सिराजने श्रीलंकेच्या फलंदाजांना श्वास घेण्यास देखील संधी दिली नाही. श्रीलंकेचे फलंदाज पिचचा अंदाज घेऊन माघारी परतत होते. टीम इंडियाने श्रीलंकेचं आव्हान फक्त 37 बॉलमध्ये पूर्ण केलं अन् आशिया कप आठव्यांदा पटकावला. सामना जिंकल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला सर्व खेळाडू जमले होते. त्यावेळी विराट कोहली अँड कंपनी मस्ती करताना दिसली.

पाहा Video

विराट कोहली याने बाबूभैयाच्या स्टाईलमध्ये वॉक केला. तर इशान किशनने विराट कोहलीच्या चालण्याची स्टाईल कॉपी केली. त्यानंतर मैदानात सर्व खेळाडू कल्ला करताना दिसले. सध्या हा व्हिडीओ सोशल मी़डियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी कोहलीच्या स्टाईलचं कौतुक केलंय. तर कोणी इशानचे गो़डवे गातंय. मात्र, काहीही टेन्शन असलं तरी मस्ती करायची सोडायची नाय, हे विराट अँड कंपनीने दाखवून दिलंय.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *