‘त्यावेळी रोहितने…’, गावसकरांनी सांगितला वर्ल्ड कप Final मधला टर्निंग पॉइण्ट; इथेच गमावली मॅच

Sunil Gavaskar On Rohit Sharma Mistake: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेत सलग 10 सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवल्यानंतर अंतिम सामन्यामध्ये भारताने कच खाल्ली आणि वर्ल्ड कपने पुन्हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने हुलकावणी दिली. सेमी फायलनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये 397 धावांचा डोंगर उभारणाऱ्या रोहित शर्माच्या संघाकडून फायलनमध्ये मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. मात्र भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या अगदी उलट कामगिरी फायलनमध्ये केली. भारतीय संघाला पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध केवळ 240 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियन संघाने हे माफक आव्हान 6 गडी बाकी असतानाच जिंकलं आणि वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरलं.

गावसकरांनी साधला निशाणा

ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धच्या सामन्यामधील भारतीय फलंदाजीचं विश्लेषण करताना माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघावर निशाणा साधला आहे. जे ऑस्ट्रेलियाचे नियमित गोलंदाज नाहीत असा गोलंदाजांना भारतीय फलंदाजांनी लक्ष्य केलं नाही. भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा नेहमीप्रमाणे मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूडसारख्या जागतिक स्तरावरील वेगवान गोलंदाजांच्या गोलंदाजीची पिसं काढत होता. त्यामुळेच पॅट कमिन्सने 10 ओव्हरच्या आतच ग्लेन मॅक्सवेलसारख्या फिरकीपटूकडून गोलंदाजी करुन घेतली.

गावसकर म्हणतात, हा ठरला टर्निंग पॉइण्ट

पॅट कमिन्सने खेळलेला हा डाव ऑस्ट्रेलियाला फायद्याचा ठरला. मॅक्सेवेलला मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा 31 बॉलमध्ये 47 धावा करुन बाद झाला. गावसकर यांच्या दाव्यानुसार रोहित शर्मा बाद झाला तोच सामन्याचा टर्निंग पॉइण्ट ठरला. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने मागे फळत जात रोहितचा अप्रतिम झेळ घेतला. “तोच सामन्याचा टर्निंग पॉइण्ट ठरला. रोहित शर्मा उत्तम फलंदाजी करत होता. तो अशाच पद्धतीने खेळतो. माझ्यामते त्या ओव्हरला एक सिक्स आणि एका फोरने आधीच 10 धावा झाल्या होता. त्यावेळेस त्याने तो फटका मारायला नको हवा होता. मला ठाऊक आहे की तो फटका योग्य पद्धतीने बसला असता तर तो सिक्स गेला असता. तेव्हा आपण सर्वांनी उठून टाळ्या वाजवत त्याचं कौतुक केलं असतं. मात्र कायम पाचवा गोलंदाज असा असतो की ज्याला आपण लक्ष्य करु शकतो. सामन्यामध्ये त्या क्षणी घाई करण्याची गरज नव्हती,” असं गावसकर यांनी ‘स्टार स्पोर्ट्स’ला दिलेल्या मुलाखतीत रोहितची चूक दाखवून देताना म्हटलं.

Related News

ऑस्ट्रेलियाने सामना जिंकल्यानंतर अशा संघाकडून पराभव झाल्यास फार वाईट वाटत नाही, असं म्हणत गावसकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू कामगिरीचं कौतुक केलं.

भारताच्या डावात काय झालं?

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य वाटलं. भारताने नेहमीप्रमाणे या सामन्यालाही दमदार सुरुवात केली. रोहित शर्माने त्याच्या आक्रमक शैलीमध्ये फटकेबाजी केली. मात्र शुभमन गिल स्वस्तात परतल्यानंतर रोहित शर्माही अर्धशतकापासून 3 धावा दूर राहिला. रोहित बाद झाल्यानंतर धावांचा वेग मंदावला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अहमदाबादच्या वापरलेल्या खेळपट्टीचा पूर्ण वापर केला. विराट कोहली आणि के. एल. राहुल या दोघांनाही अर्धशथकं झळकावली. मात्र त्यांनी फारच संथ खेळ केल्याची टीका सोशल मीडियावरुन होताना दिसतेय. सूर्यकुमार यादवलाही या सामन्यात विशेष चमक दाखवता आली नाही. तळाचे फलंदाज कुलदीप यादव आणि सिराज यांनी तळाशी फलंदाजी करताना काही फटकेबाजी केल्याने भारताचा स्कोअर 240 पर्यंत पोहोचला.

…अन् ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला

भारतीय गोलंदाजांनी उत्तम सुरुवात केली. 47 धावांवर ऑस्ट्रेलियाचे 3 गडी तंबूत परतले होते. मात्र ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबूशेनने 192 धावांची पार्टनरशीप केली. हेडने शतक झळकावत वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा 7 वा खेळाडू होण्याचा मान मिळवला. भारताचा 6 विकेट्सने पराभव करुन ऑस्ट्रेलियन संघ 6 व्यांदा विश्वविजेता ठरला. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, अॅशेज आणि टी-20 वर्ल्ड कपही जिंकला आहे.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *