- Marathi News
- National
- Navneet Rana Attack On Opponent In Parliament Session |MP Rana Said Opposition Only Narendra Modi Target
नवी दिल्ली6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
संसदेत अविश्वास प्रस्तावाच्या चर्चासत्रात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीन राणा यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, अविश्वास प्रस्तावाला मी विरोध करत आहे. हा प्रस्ताव यासाठी होता की, महिलांवरील झालेल्या अत्याचारावर चर्चा व्हायला पाहिजे. परंतू दुपारी बारा वाजेपासून विरोधक केवळ मोदींना टारगेट करत आहे. त्यांना महिलांच्या समस्यांवर चर्चाच करायची नाही. केवळ पंतप्रधान मोदींना टारगेट करण्याचा त्यांचा उद्देश आहे.
हेतुपुरक षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाईची मागणी
नवनीत राणा पुढे बोलताना म्हणाल्या की, मणिपूरमधील महिला अत्याचाराची घटना अतिशय वाईट आहे. पण ही घटना 4 मे रोजी असल्याचे समोर आले. त्याचवेळी विरोधकांची टीम त्याठिकाणी का गेली नाही. पण त्यांना महिला अत्याचाराचा मुद्दा पुढे करून केवळ बदनामी करायची आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधल्या दिवशी हा व्हिडओ व्हायरल होतो. त्यानंतर संसदेचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधक मणिपूरमध्ये जातात. यांना केवळ फोटो सेशन करायचे होते. रडणाऱ्या आईचा व्हिडिओ शूट करून लोकांना दाखवायचा होता. त्यामुळे माझी मागणी आहे की, यामागे हेतूपुरक काम करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, असे म्हणत राणा यांनी विरोधकांना टोला लगावला.
यांना महिलांच्या नावाखाली राजकारण करायचे
नवनीत राणा म्हणाल्या की, मी देखील एक महिला आहे. मणिपूरमधील महिला अत्याचाराची घटना वाईट आहेच. पण विरोधक केवळ राजकारण करू पाहत आहे. धक्कादायक बाब म्हणज राजस्थानमधील गेल्याच आठवड्यात एका नाबालिग मुलीवर अत्याचार झाला. तिला जीवंत जाळले गेले, त्यावर हे विरोधक गप्प का बसले आहेत. त्या अत्याचाराच्या घटनेचा त्यांनी साधा उल्लेख देखील केला नाही. यातून सिद्ध होते की, यांना महिलांच्या नावाखाली राजकारण करायचे आहे.
महाराष्ट्रात महिला एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय
महाराष्ट्रात देखील आपला लढा देण्यासाठी एसटी महामंडळाच्या महिला कर्मचारी रस्त्यावर आल्या. तर त्यांच्यावर अन्याय केला गेला. त्यांना महिनाभर जेलमध्ये टाकले गेले. त्यांना अडकवून त्रास दिला गेला. त्या महिला अन्यायावर हे विरोधक का बोलत नाही. केवळ मणिपूरचा विषय पुढे करून मोदींना टारगेट करण्याचे काम हे लोक करू पाहत आहेत.
मला देखील 14 दिवस तुरूंगात डांबले
हनुमान चालिसाची घोषणा केली तर मला घरातून फरपटत नेत 14 दिवस जेलमध्ये टाकले गेले. पण येथे मोदींचे सरकार आहे. हनुमान चालिसा म्हटली म्हणून कोणावरही अन्याय होणार नाही. असे नवनीन राणा म्हणाल्या. तर महाराष्ट्रातील माझे सहकारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणी योग्य प्रश्न उपस्थित केला असल्याचे सांगून त्यांनी त्यांची बाजू देखील मांडली.
विरोधकांनी सन्मान करणे शिकावे
खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, मणिपूर महिला अत्याचाराची घटना पुढे करून केवळ राजकारण करू नका. विरोधकांनी महिलांचा सन्मान देखील केला पाहिजे. त्याची शिवकण त्यांनी घेण्याची गरज असल्याचा टोला देखील राणांनी लगावला.