अकोला8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
गुंठेवारी नियमानुकुलचे ऑफ लाईन पद्धतीने प्रस्ताव 31 ऑगस्टला सायंकाळ पर्यंत प्रस्ताव दाखल करता येणार आहेत. मुख्य कार्यालयासह झोन कार्यालयात प्रस्ताव दाखल करता येणार असून नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेची हद्दवाढ झाल्या नंतर गुंठेवारी पद्धतीच्या भागात वाढ झाली. तुर्तास जवळपास 35 टक्के भाग गुंठेवारीचा आहे. 2014 पासून महापालिकेने गुंठेवारीचे नियमानुकुल करणे बंद केले होते. मात्र 2020 साली राज्य शासनाने गुंठेवारी नियमानुकुल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ज्या नागरिकांनी 31 डिसेंबर 2020 पूर्वी गुंठेवारी पद्धतीचे प्लॉट अथवा घर घेतले असेल त्यांना गुंठेवारी नियमानुकुल करण्याचा मार्ग मोकळा झाला. ऑन लाईन पद्धतीने प्रस्ताव स्विकारताना आलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेवून प्रशासनाने गुंठेवारी प्लॉटचे तसेच गुंठेवारी प्लॉटवर बांधलेल्या घराचे नियमानुकुल ऑफ लाईन पद्धतीने सुरु करण्याचा निर्णय घेतला. 31 ऑगस्ट पर्यंत ऑफ लाईन प्रस्ताव स्विकारले जाणार आहेत. त्यानंतर गुंठेवारी नियमानुकुलचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत. त्यामुळे ज्या नागरिकांकडे गुंठेवारी पद्धतीचे प्लॉट आहेत. त्यांना प्रस्ताव दाखल करण्याची ही अखेरची संधी आहे.
आतापर्यंत 500 पेक्षा अधिक प्रस्ताव दाखल
मार्च नंतर दोन महिने प्रस्ताव स्विकारण्याचे काम बंद होते. त्यानंतर सुरु करण्यात आले. आता पर्यंत ५०० पेक्षा अधिक प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे अखेरच्या दिवशी किती प्रस्ताव दाखल होतात, याकडे लक्ष लागले आहे.