Babar Azam: पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये राडा; बाबर आझम-शाहीन आफ्रिदी एकमेकांशी भिडले

Babar Azam: एशिया कप ( Asia cup 2023 ) स्पर्धेमध्ये आज भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये फायनल सामना रंगणार आहे. यावेळी टीम इंडिया 8 व्यांदा ट्रॉफीवर नाव कोरणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. या एशिया कपमध्ये ( Asia cup 2023 ) पाकिस्तानच्या टीमकडून निराशाजनक कामगिरी पहायला मिळाली. दरम्यान श्रीलंकेविरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये वादविवाद झाल्याचं समोर आलंय. 

पाकिस्तानच्या खराब कामगिरीवरून कर्णधार बाबर आझम ( Babar Azam ) आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं दिसून आलं. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया. 

पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये भिडले बाबर-शाहीन

आशिया कपच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला सुपर 4 मध्ये 2 सामन्यांमध्ये विजय गरजेचा होता. मात्र यावेळी पाकिस्तानला केवळ बांगलादेशावर विजय मिळवणं शक्य झालं. श्रीलंकेविरुद्ध करो या मरोचा सामना गमावल्यानंतर बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी ड्रेसिंग रूममध्ये एकमेकांशी भिडल्याचं समोर आलंय.

Related News

एका पाकिस्तान मिडीयाने दिलेल्या माहितीनुसार, हे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये एकमेकांशी भिडले. त्यानंतर मोहम्मद रिझवानने दोघांमध्ये मध्यस्ती करत हे प्रकरण शांत केलंय.

कोणत्या गोष्टीवरून झाला दोघांमध्ये वाद

पाकिस्तानी चॅनल बोल न्यूजने दिलेल्या माहितीप्रमाणे, श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझम टीमच्या खेळाडूंना सांगत होता की, ‘टीममधील कोणताही खेळाडू जबाबदारीने खेळत नाही.’ दरम्यान यावर शाहीन आफ्रिदीने उत्तर दिलं, ‘असं नाही किमान ज्याने चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केलीये त्यांचं कौतुक केलं पाहिजे.’ 

मिळालेल्या माहितीनुसार, शाहीनचं हे उत्तर बाबरला आवडलं नाही. यावर तो म्हणाला, ‘मला माहितीये की कोण चांगली कामगिरी करतंय.’ या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू होता. अखेर यामध्ये मोहम्मद रिझवानने वाद मिटवला आणि प्रकरण शांत केलं. 

पाकिस्तानचं एशिया कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं

आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तान टीम सुपर 4 साठी पात्र ठरली होती. यानंतर सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला पण दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 228 रन्सने पराभव केला. श्रीलंकेविरुद्धही पाकिस्तानला पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवामुळे पाकिस्तानचं यंदाचा एशिया कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *