BAN vs NZ: या पुढेही आम्ही मंडकिंग करणार…; ईश सोढीला माघारी बोलवण्याच्या मुद्द्यावरून बांगलादेशी खेळाडू नाराज

Tamim Iqbal: बांगलादेश आणि न्यूझीलंडमध्ये ( BAN vs NZ ) सिरीज सुरु असून यांच्यामध्ये मंकडिंग पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मंकडिंग हे कोणतीही चुकीची पद्धत नसून खेळाच्या भावनेला अनुसरून असल्याची चर्चा होतेय. मंकडिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. यावेळी ते खेळाच्या स्पिरीटच्या विरुद्ध मानलं जातं. पण असाच काहीसा प्रकार 23 सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात पाहायला मिळाला. दरम्यान यावर बांगलादेशाचा माजी खेळाडू तमीम इक्बाल ( Tamim Iqbal ) याने यावर आक्षेप नोंदवला आहे. 

बांगलादेश आणि न्यूझीलंड सामन्यात झालं मंकडिंग

बांगलादेश आणि न्यूझीलंड ( BAN vs NZ ) यांच्यातील सामना 23 सप्टेंबर रोजी खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंड फलंदाजी करत असताना एक मोठी घटना घडली. डावाच्या 46व्या ओव्हरमध्ये गोलंदाज हसन महमूदने फलंदाज ईश सोढीला मंकडिंग पद्धतीने रनआऊट केलं. यावेळी थर्ड अंपायरनेही त्याला आऊट दिलं.  

त्यानंतर बांगलादेशच्या टीमने चर्चा करून स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत पॅव्हेलियनमध्ये परतत असताना ईश सोधीला माघारी बोलावलं. दरम्यान बांगलादेशाच्या टीमने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होतंय. पण अशातच टीमचा वरिष्ठ खेळाडू तमीम इक्बालने ( Tamim Iqbal ) यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

Related News

बांगलादेशाचा पूर्व कर्णधार तमीम इक्बालच्या ( Tamim Iqbal ) म्हणण्यानुसार, ‘मंकडिंगच्या पद्धतीने रनआऊट करणं चुकीचं नाही. मुळात या पद्धतीला आयसीसीने रनआऊट म्हणूनही मान्यता दिलीये. जर आम्ही एखाद्या खेळाडूला मंकडिंगद्वारे आऊट केलं तर तो बाद होतो आणि त्याची विकेट आम्हाला मिळाली पाहिजे. 

तमीम पुढे म्हणाला, मात्र आजकाल लोक अशा विकेट्स घेण्यावर नकारात्मक प्रतिक्रिया देतायत. परंतु हे खरं आहे आणि भविष्यातही टीमने असा पद्धतीने विकेट घेण्याचा निर्णय घेतला तर आम्ही अशा विकेट्स घेण्यास मागेपुढे पाहणार नाही.

इशने लिटन दासला मारली मिठी

मिरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज हसन महमूद (Hasan Mahmood) याने ईश सोढीला मंकडिंग (Mankadig appeal) केलं. त्यावेळी तो 26 चेंडूत 17 धावा करत फलंदाजी करत होता. ईश सोढी (Ish Sodhi) आधीच नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी क्रीजच्या बाहेर होता. ईश सोढीने रिव्ह्यू घेतला अन् थर्ड अंपायरने सोढीला बाद जाहीर केलं. पण बांगलादेशचा कर्णधार लिटन दास (Litton Das) आणि सौम्या सरकार यांनी अंपायरशी बोलून सोढीला परत बोलावलं. सोढी परत आल्यावर त्याने हसनला मिठी मारली. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *