Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते पदवीधरांना नोकरी, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक

Central Bank Of India Bharti 2023: कमी शिक्षण असेल तर चांगले पद आणि पगाराची नोकरी कशी मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आता काळजी करु नका. तुम्ही आठवी उत्तीर्ण असाल तरी देखील तुम्हाला बॅंकेत नोकरीची संधी मिळणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार असून यामध्ये आठवी ते पदवीधरांपर्यंत सर्वजण अर्ज करु शकतात. 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम गार्डनर आणि अटेंडरचे प्रत्येकी 1 पद भरले जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यवतमाळ ब्रांचसाठी ही भरती केली जाणार आहे.

फॅकल्टी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदव्युत्तरपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असावे. मराठी भाषेचे ज्ञान आणि स्थानिक असणाऱ्या उमेदवारांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 20 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे.

Related News

विद्यापीठ अनुदान आयोगात विविध पदांची भरती, पुण्यात नोकरीसह 2 लाखांपर्यंत मिळेल पगार

ऑफिस असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असावा. उमेदवाराल कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असावे. तसेच तो स्थानिक जिल्ह्यातील असावा. या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांदरम्यान असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 12 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे.

वॉचमन कम गार्डनर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार आठवी उत्तीर्ण असावा, या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असावे.  उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असावे. तसेच तो स्थानिक जिल्ह्यातील असावा. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 6 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे.

अटेंडर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार आठवी उत्तीर्ण असावा,  या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असावे.  उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असावे. तसेच तो स्थानिक जिल्ह्यातील असावा. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 8 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे.

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती, पदवीधरांना मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

एससी/एसटी उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून अर्ज करता येणार आहे. उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज  क्षेत्रीय प्रमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पहिला मजला, प्लॅटिनम एम्पायर बिल्डिंग, तेओसा जिन समोर, अमरावती 444601 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 17 ऑगस्ट 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *