‘अजित पवार सत्तेतून बाहेर पडा’: मराठा आंदोलकांच्या घोषणांनी बारामती दुमदुमली, अजितदादा काय प्रतिक्रिया देणार? याकडे लक्ष

बारामती38 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘सरकारचा भरलाय घडा, अजित पवार सरकारच्या बाहेर पडा’ अशा घोषणांनी आज मराठा आंदोलकांनी बारामती दणाणून सोडली. जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ आज बारामतीत देखील कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तसेच, मराठा संघटनांकडून मोर्चाही काढण्यात आला आहे. याचवेळी आंदोलकांनी अजित पवारांबाबत या घोषणा दिल्या.

Related News

बारामतीची बाजारपेठ बंद

मराठा संघटनांनी आज पुकारलेल्या बंदला बारामतीतील व्यापा-यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बारामतीमधील दुकाने व बाजारपेठ आज पूर्णपणे बंद आहे. सकल मराठा समाजाकडून आज सकाळी बारामतीच्या कसब्यातील श्री छत्रपती शिवाजी उद्यानापासून मोर्चा काढण्यात आला. गुनवडी चौक, गांधी चौक, सुभाष चौकमार्गे भिगवण चौकात मोर्चा येणार आहे. त्यानंतर सभा होणार असून विविध मान्यवर आपले विचार व्यक्त करणार आहेत.

अजितदादांनी फडणवीसांचा राजीनामा घेण्याची मागणी

आंदोलनात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या मारलेले फोटो आंदोलकांनी झळकावले.

आंदोलनात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या मारलेले फोटो आंदोलकांनी झळकावले.

मराठा संघटनांकडून बारामतीमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. काटेवाडी येथेही सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा फडणवीस यांची साथ सोडावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. जालना येथील घटनेला सर्वस्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाने हा लाठी हल्ला करत आंदोलकांना गंभीर जखमी केले, हे दुर्दैव आहे. महिलांसह लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आली, हे संतापजनक आहे. आमचा पोलिसांवर रोष नाही, मात्र वरिष्ठांच्या आदेशाने हे कृत्य केले. मात्र त्यांना आदेश देणाऱ्या वरिष्ठांविषयी आमचा राग आहे, असे आंदोलक म्हणाले.

अजितदादांकडून आम्हाला अजूनही अपेक्षा

काटेवाडी येथे झालेल्या आंदोलनात आंदोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या मारलेले फोटो आंदोलकांनी झळकावले. मात्र यावेळी अजितदादांचा फोटो का नव्हता? अशी विचारणा केली असता आंदोलक म्हणाले, जालन्यातील घटनेला सर्वस्वी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. अजितदादांकडे आम्ही सकल मराठा समाज अपेक्षेने पाहत आहोत. त्यांनी फडणवीसांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

संबंधित वृत्त

फडणवीसांनी मराठा समाजाची माफी मागावी:मनोज जरांगे यांच्याशी चर्चेनंतर राज ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे. सत्तेत असताना या विषयावर बोलायचे नाही, आणि विरोधात गेल्यावर मागणी करायची, असेच आजपर्यंत राजकारणी करत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राजकारणी लोकांच्या नादी लागू नका, असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले आहे. वाचा सविस्तर

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *