बीसीसीआयने केला कपिल देव यांचा अपमान? फायनलसाठी आमंत्रण नाही, म्हणतात ” माझ्या संपूर्ण 83 टीमला…”

World Cup 2023 IND vs AUS Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक लाख तीस हजार क्षमतेच्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये (Narendra Modi Stadium, Ahmedabad) फायनल सामना खेळवला जातोय. हा सामना पाहण्यासाठी जगभरातून प्रेक्षक अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत. वर्ल्ड कपच्या फायनलसाठी (World Cup 2023 Final) बीसीसीआयने जोरदार तयारी केली होती. आत्तापर्यंत वर्ल्ड कप जिंकणाऱ्या सर्व कॅप्टन्सला सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाला 1983 साली वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कपिल देव (Kapil Dev) यांना आमंत्रण दिलं नाही. त्यामुळे कपिल देव नाराज असल्याचं पहायला मिळत आहे.

कपिल देव यांना वर्ल्ड कप फायनलमध्ये आमंत्रण दिलं जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना बोलवण्यात आलं नव्हतं. त्यावर एका माध्यमांमध्ये बोलताना कपिल देवने मोठा खुलासा केला आहे. कपिल देव एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्या उपस्थितीवरून मोठा प्रश्न उभा राहिला. कपिल देव यांना आमंत्रण नव्हतं का? असा सवाल पत्रकाराने कपिल देव यांना विचारला. त्यावर कपिल देव काय म्हणाले पाहा…

काय म्हणाले Kapil Dev ?

तुम्ही मला आमंत्रित केलं, त्यामुळे मी आलो. त्यांना मला आमंत्रित केलं नाही म्हणून मी गेलो नाही. मला वाटलं होतं की, माझ्या 83 च्या संपूर्ण वर्ल़्ड कप संघाला आमंत्रित करतील, अशी माझी इच्छा होती. मात्र, त्यांच्या कामाचा व्याप मी समजू शकतो. वर्ल्ड कप फायनलची तयारी करणं सोपं काम नाही. खूप काम त्यांच्याकडे असतं. त्यामुळे त्यांनी मला बोलवलं नसेल, असं कपिल देव म्हणाले आहेत.

Related News

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *