World Cup 2023 : सेमीफायनलच्या तोंडावर BCCI ने घेतला मोठा निर्णय! हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून ‘आऊट’, पण…

Vice Captain of Indian team : वर्ल्ड कपचे (World Cup 2023) सेमीफायनलचे सामने तोंडावर असताना आता टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik pandya) वर्ल्ड कपमधून बाहेर पडलाय. पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा (Prasidh Krishna) संघात समावेश करण्यात आला आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर होता. मात्र, आता तो उर्वरित सामने खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. हार्दिक बाहेर पडल्यानंतर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी केएल राहुल (KL Rahul) याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

निवड समितीने केएल राहुलला रोहित शर्माचा उपकर्णधार म्हणून नाव देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल यांच्या नावाची चर्चा होती, मात्र सिलेक्टर्सने राहुलच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय, अशी माहिती देखील समोर आलीये.  हार्दिक पांड्या टीम इंडियाचा उपकर्णधार होता. मात्र, घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे आता केएल राहुलची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलीये.

बीसीसीआयने विश्वचषकाच्या उर्वरित सामन्यांसाठी केएल राहुलची भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. त्याला शनिवारी सकाळी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी याची माहिती दिली, अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या हवाल्यातून समोर आली आहे. 

Related News

आणखी वाचा – अफगाणिस्तानच्या नशिबाचं दार उघडलं, इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ मानाच्या स्पर्धेसाठी पात्र!

दरम्यान, पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा (Prasidh Krishna) संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, टीम इंडिया सध्याच्या संघासह मैदानात उतरेल, अशी शक्यता आहे. मात्र, आणखी एखादा खेळाडू जायबंदी झाला तर मोठा बदल संघात दिसू शकतो. उद्या टीम इंडिया साऊथ अफ्रिकेशी भिडणार आहे. हार्दिक सारखा ऑलराऊंडर संघात नसल्याने कोणता परिणाम होईल? असा सवाल आता नेटकऱ्यांनी विचारला आहे. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *