IND Vs PAK: ऐन सामन्याआधी टीम इंडियात मोठा उलटफेर, ‘हा’ खेळाडू नंबर चारवर खेळणार.. रोहित शर्माचा मोठा निर्णय

Asic Cup 2023 India vs Pakistan : एशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. टीम इंडियाचे (Team India) कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी स्पर्धेपूर्वीच सुरुवातीच्या दोन सामन्यात केएल राहुल  (KL Rahul) खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर अजीत आगरकर (Ajit Agarkar) यांनीही केएल राहुल दोन-तीन सप्टेंबरपर्यंत फिट होईल असं सांगितलं होतं. अशात केएल राहुसच्या गैरहजेरीत टीम इंडियात नंबर चारवर कोणता फलंदाज मैदानात उतरणार याची उत्सुकता भारतीय क्रिकेट प्रेमींना लागलीय. 

केएल राहुल ऐवजी विकेटकिपर म्हणून प्लेईंग इलेव्हनमध्ये इशान किशन (Ishan Kishan) खेळणार हे जवळपास निश्चित आहे. पण तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार हा प्रश्न आहे. टीम इंडियात ईशान किशन सलामीला फलंदाजी करतो. सलामीला येत ईशाने एकिदवसीय क्रिकेटमध्ये तीन अर्धशतकं केली आहेत. तर एकदिवसीय सामन्यात केएल राहुल मधल्या फळीत खेळतो. 

रोहित शर्मासमोर पर्याय
एशिया कप स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला खेळेल. अशात ईशान किशनला संधी दिल्यास कोणत्या नंबरवर खेळणार असा प्रश्न आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईशान किशन नंबर तीनला फलंदाजीला उतरु शकतो. तर विराट कोहली नंबर चारवर फलंदाजीला येऊ शकतो. किंवा टीम मॅनेजमेंट इशानला नंबर चार किंवा पाचवर खेळवण्याचा विचार करत आहे. रोहत शर्मा पहिल्या तीन क्रमांकात उलटफेर करण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे ईशान किशन नंबर चारवर फलंदाजीला येण्याची दाट शक्यता आहे. 

Related News

प्रयोग यशस्वी ठरणार?
वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडियाने अनेक प्रयोग केले होते. याच कारणामुळे एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सलामीच्या फलंदाजाला नंबर चारवर फलंदाजीला उतरवणं टीम इंडियासाठी किती फायदेशीर ठरेल याबाबतही प्रश्न उपस्थित होतोय. पण इशान किशन पहिल्यांदाच चार नंबरवर फलंदाजीला खेळत नाहीए. नंबर चारवर खेळताना ईशानने 6 सामन्यात 106 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकी खेळीचा समावेश आहे.

आतापर्यंतची कामगिरी पाहिली तर ईशान किशन स्पीन गोलंदाजीसमोर नीट खेळू शकत नाही. त्यामुळे कोहलीला नंबर चारवर खेळवणं टीम इंडियासाठी फायदेशीर ठरू शकतं. 

पाहा संभाव्य प्लेईंग XI 
रोहित शर्मा, शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

 

 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *