औरंगाबाद3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या भिंदोन शाळेत मातृ पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुलांकडून झालेल्या पूजनाने सर्व गाव भारावून गेला.तसेच इतर शाळा व गावका-यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमाचे सर्वञ कौतुक होत आहे.
विभक्त कुटुंब पद्धती, आई -वडील दोघेही नोकरीच्या निमित्ताने बाहेर असणे ,व्हाट्सअप ,फेसबुक, इंस्टाग्राम आदींचा अतिरेकी वापर आदी कारणामुळे कुटुंब व्यवस्थेत अनेक समस्या निर्माण होत आहे. दिवसेंदिवस आई-वडील आणि मुलांमधील दूरी वाढत आहे. भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना अनन्य साधारण महत्त्व आहे .आई- वडिलांविषयी प्रेम ,जिव्हाळा, आदरभाव वाढीस लागावा या उद्देशाने शाळेत मातृ-पितृ पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

अनेकांच्या डोळ्यात आले आनंदाश्रु
याप्रसंगी शाळेतील मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या पद पावलांचे जलार्पण करून पूजन केले. तसेच पुष्प अर्पण करून आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. लहानग्यांकडून होत असलेल्या या पूजनाने अनेक मातांच्या डोळ्यात अश्रू तरवळले. अश्रू अनावर होत असलेल्या अनेकींनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. याप्रसंगी केंद्रप्रमुख दादाराव नरवडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले .अशा उपक्रमांमधून बालवयात चांगले संस्कार होऊन सुंस्कृतभावी पिढी निर्माण होण्यास मदत होते असे उद्गार काढले.
या मान्यवरांची होती उपस्थिती
कार्यक्रमास सरपंच प्रतीक्षा क्षीरसागर, उपसरपंच विठ्ठलराव शिंदे ,अध्यक्ष बाबुराव आगळे, मुख्याध्यापक कैलास गायकवाड ,सेवानिवृत्त आदर्श शिक्षक कोंडीराम भावले आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश नलावडे, पल्लवी गजेवार, सुधा शिरोडकर ,ताजीमुद्दीन शेख, प्रशांत थोरात, पांडुरंग शिंदे, इसाक शेख, संदीप पटेकर आदींनी परिश्रम घेतले.