भूमिका: मराठवाडयाच्या हक्काचे पाणी तात्काळ द्या, पाणी संवाद परिषदेत एकमताने निर्णय; पाठपुरावा करण्याचा निर्धार

औरंगाबाद8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. पाण्याची आवकही नगण्य झाली आहे. आगामी पाणी टंचाई लक्षात घेऊन वरच्या भागातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी लगेच सोडण्यात यावे. यासाठी पाणी परिषदेत एकमताने ठराव मंजुर करण्यात आला. तसेच पाण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला.

मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर 8 ऑगस्ट रोजी पाणी संवाद परिषद संपन्न झाली. या परिषदेचे आयोजन गांधी स्मारक निधी आणि पाणी हक्क परिषद यांच्या विद्यमाने करण्यात आले होते.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. डॉ ऋषीकेश कांबळे, प्रा.डॉ.शेषराव चव्हाण, जलसंपदाचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक शंकर नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सिंचन कृती आराखड्यातील किती कामे खरी?

नागरे म्हणाले की, मराठवाड्याचे हक्काचे पाणी शासनाने तात्काळ मराठवाड्याला द्यावे. कोकणा मधून मराठवाड्यासाठी 23 ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या शासन निर्णया अन्वये 167 टीएमसी पाणी द्यायला पाहिजे होते. त्यावर अद्याप अमलबजावणी झालेली नाही. एम डब्ल्यू आर आर ए या कायद्याअंतर्गत याचिका दाखल केल्याचे सुद्धा सांगितले.

आंध्रप्रदेशला दिलेल्या 14 टीएमसी एवढे हिशेबाचे काय? असा सवाल उपस्थित करून या पाण्याचा उपयोग लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यासाठी झाला असता परंतु तो सुद्धा पूर्ण न करता मराठवाड्याचा अनुशेष अद्यापही भरला नसल्यामुळे मराठवाड्यावर अनेक संकटे उभी राहिले आहेत. तर सिंचन कृती आराखड्यातील किती कामे खरी आणि किती कामे कागदोपत्री? असा परखड सवाल पाणी पुरवठा विषयाचे अभ्यासक व जलतज्ञ राजेंद्र दाते पाटील यांनी उपस्थित केला.

आमच्या हक्काच्या पाण्यावर नेहमीच डल्ला

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणांमधील जलसाठा 65 टक्के वर गेल्यानंतर या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडले पाहीजे या दृष्टिकोनातून शासनाने विशेष नियोजन करणे गरजेचे असून पिण्यासाठी व शेतीसाठी असलेल्या नियम आणि धोरणा प्रमाणे जायकवाडी धरणात पाणी तात्काळ सोडले जावे, अशी आग्रही मागणी केली. आमच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारण्यासाठी अतिरिक्त लहान मोठी आणि मध्यम धरणे बांधून सुमारे 3 हजार 306.79 दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाणी साठविण्यात येते.

…तर जायकवाडीत पाणी सोडणे बंधनकारक

वास्तविक पहाता 15 ऑक्टोबर रोजी जायकवाडी धरणात 65 टक्के पाणी नसेल तर उर्ध्व भागातील नगर नाशिक मधील धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडणे बंधनकारक आहे. जायकवाडी धरणाच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षात बांधण्यात आलेल्या अतिरिक्त लहान मोठी आणि मध्यम धरणे बांधून सुमारे 3 हजार 306.79 दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाणी साठविण्यात आले आहे. या प्रकारामुळे मराठवाड्यातील जनतेच्या हक्काच्या पाण्यावर सातत्यानं डल्लाच मारल्या जात असल्याचेही त्यांनी नमुद केले.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *