सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलसंदर्भात वर्ल्डकपआधीच भारतीय संघाचा मोठा निर्णय

India vs Australia Third ODI In Rajkot: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान इंदूरच्या मैदानामध्ये झालेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने 99 धावांनी जिंकला. या सामन्यामधील सर्वात सकारात्मक बाब म्हणजे भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला सूर गवसला. तसेच या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर शुभमन गिलनेही खणखणीत शतक झळकावलं. शुभनचं हे यंदाच्या वर्षातील 5 वं शतक ठरलं आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये शुभमनने अर्धशतक झळकावलं होतं. असं असतानाच आता भारतीय संघ व्यवस्थापनाने वर्ल्डकपआधीच तिसऱ्या सामन्याआधी शुभमनसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

…म्हणून घेण्यात आला निर्णय

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-0 ची विजयी आघाडी मिळवली आहे. या मालिकेतील तिसरा सामना 27 सप्टेंबर रोजी राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर शुभनम गील आणि शार्दुल ठाकूर खेळणार नाही. हे दोघेही गुवाहाटीमध्ये भारतीय संघाच्या चमूमध्ये 28 सप्टेंबर रोजी सहभागी होतील असं सांगण्यात आलं आहे. या दोघांनाही आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ल्डकपआधी या दोघांना विश्रांती देण्यासाठी निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. भारतीय संघ 5 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेआधी 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटीमध्ये इंग्लंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. 

शुभनची दमदार कामगिरी

पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये गिलने त्याच्या कामगिरीमुळे भारताच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. पहिल्या सामन्यातील अर्धशतक आणि दुसऱ्या सामन्यातील शतकाचा भारताला फायदा झाला आहे. 24 वर्षीय गिलने यंदाच्या वर्षातील पाचवं शतक झळकावलं आहे. त्याने 2 शतकं न्यूझीलंडविरुद्ध आणि प्रत्येकी एक बांगलादेश, श्रीलंका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलं आहे. शुभमनने यंदाच्या वर्षी 20 डावांमध्ये 72.35 च्या सरासरीने 105.03 स्ट्राइक रेटने 1230 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याच फलंदाजाने एवढ्या धावा केलेल्या नाहीत.

Related News

शार्दुल ठरला अपयशी

दुसरीकडे, शार्दुल ठाकूरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकाही सामन्यामध्ये एकही विकेट घेता आली नाही. शार्दुल ठाकूरला या दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजीची संधीही मिळाली नाही.

संघ बदलणार

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेआधी खेळवण्यात येत असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामन्यामध्ये वेगळाच संघ खेळणार आहे. पहिल्या 2 सामन्यांसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, विराट कोहलीला आराम देण्यात आला होता. मात्र शेवटच्या सामन्यात हे सर्व खेळाडू खेळणार आहेत. 

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल (दुखापतीमधून बरा झाला तर), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *