मोठी बातमी! हिंगोलीत भाजप कार्यालय पेटवून देण्याचं प्रयत्न, घटनास्थळी पोलीस दाखल

हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यभर तीव्र पध्द्तीने आंदोलन केले जात आहेत. बीडमध्ये आमदारांचे घर आणि कार्यालय जाळल्यानंतर याचे लोण आता हिंगोलीत पाहायला मिळत आहे. हिंगोलीमध्ये सुद्धा रात्री भाजप कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंगोली शहरातील कृषी अधीक्षक कार्यालयासमोर असलेल्या भाजप कार्यालयाला अज्ञात व्यक्तीकडून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु, याची माहिती पोलिसांना मिळाली आणि तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी आग कोणी लावली हे अजून स्पष्ट होऊ शकलं नाही. पोलिसांनी ही आग विझवली असून, आता पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आला आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला आता हिसंक वळण लागतांना पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील आता तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना समोर येत आहे. विशेष म्हणजे आंदोलकांकडून राजकीय पक्षांना टार्गेट केले जात आहे. हिंगोली शहरातील भाजप कार्यालय देखील पेटवून देण्याचं प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे सध्या पोलिसांकडून राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

Related News

आज दिवसभरात हिंगोलीत काय? 

मराठा आरक्षणासाठी आज हिंगोली जिल्हयातील वसमत शहरातील बाजारपेठ आज असणार आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी एपीएमसी बंद असणार असून, यामुळे लाखोंचे नुकसान होत आहे. सोबतच, हिंगोली-नांदेड महामार्ग डोंगरकडा येथे रोखला जाणार असून, या ठिकाणी आंदोलन होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली परभणी महामार्ग जवळा बाजार येथे मराठा समाज बांधव रास्ता रोको करणार आहे. तर, वसमत औंढा नागनाथ महामार्गावर शिरडशहापूर येथे रास्तारोको आंदोलन होणार आहे. सोबतच, वसमत तालुक्यात कवठा फाटा त्याचबरोबर शहरातील  गवळी मारुती मंदिराजवळ रास्तारोको केले जाणार आहे. 

राजकीय नेत्यांसह पक्षाच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ 

मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटले असून, आंदोलकांकडून राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी यांना प्रचंड विरोध होतांना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी राजकीय पक्षाचे कार्यालय देखील पेटवून देण्यात आल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. आमदार,खासदार यांच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यालयासमोर देखील पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मराठा आरक्षणासाठी आंदोलन तापलं! छत्रपती संभाजीनगरात आज सिटी बस बंद; ‘बागेश्वर दरबार’ उधळण्याचा इशारा

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *