आरआरटीच्या चमुला मोठे यश: गडचिरोली – वडसा वनविभागात धुमाकूळ माजविणारी टी-14 वाघीण जेरबंद, फरी जंगलात होती दहशत

नागपूरएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

गडचिरोली आणि वडसा वनविभागात नागरिकांना आणि पाळीव प्राण्यांना आपले लक्ष्य करुन धुमाकूळ माजविणाऱ्या टी-14 वाघीणीला रविवारी वडसा वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र शिवराजपूर मधील कक्ष क्र. 866 मध्ये जेरबंद करण्यात वडसा वनविभाग आणि आरआरटीच्या चमुला मोठे यश आले आहे.

11 सप्टेंबर रोजी महानंदा मोहुर्ले यांच्यावर कक्ष क्र. 853 मध्ये हल्ला करीत टी-14 या वाघीणीने ठार केले होते. दुसऱ्या दिवशी एक बैल ठार केला. टी-14 वाघीणीच्या या परिसरातील वास्तव्यामुळे वाटसरू आणि नागरिकांमध्ये दहशत होती. उसेगाव, फरी, शिवराजपूर, अरततोंडी या मार्गावर येणेजाणे करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रयत्न करीत असल्याच्या बऱ्याच तक्रारी होत्या.

त्यामुळे वनविभागाकडून सदर वाघीणीचे नियंत्रण करण्याची कार्यवाही सुरू होती. रस्त्याने जाणेयेणे करणाऱ्या नागरिकांवर धावून हल्ला करण्याची प्रवृत्ती पाहता या वाघीणीमुळे भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याकरीता मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी जेरबंद करण्याची परवानगी दिली होती. त्या नंतर रविवारी तिला जेरबंद करण्यात आले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत खोब्रागडे व आरआरटीचे प्रमुख व शार्प शूटर अजय मराठे यांनी डार्ट करुन बेशुध्द केल्यावर वाघिणीला कोणतीही इजा न करता पिंजराबंद केले.

सदरची कार्यवाही वनसंरक्षक रमेशकुमार, यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, उपविभागीय वन अधिकारी मनोज चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे यांच्या उपस्थितीत तसेच अक्षय दांडेकर, अमोल पोरटे यांच्या मदतीने पार पाडली. जेरबंद करण्यात आलेल्या वाघीणीचे (मादी) वय अंदाजे 2 वर्षे असून तिला बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय गोरेवाडा, नागपूर येथे हलविण्यात आले आहे, अशी माहिती वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दिली आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *