Bill Gates & Neeta Ambani : ‘गेट्स फाउंडेशन सोबत रिलायन्सचा भारतातील 10 लाख महिला उद्योजकांसाठी विशेष उपक्रम | महातंत्र

महातंत्र ऑनलाइन डेस्क : Bill Gates & Neeta Ambani : मिलिंडा अँड बिल गेट्स फाउंडेशन आणि रिलायन्स फाउंडेशनने संयुक्तरित्या भारतातील 10 लाख महिला उद्योजकांसाठी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. पुढील तीन वर्षांत, हा उपक्रम महिलांना शेती आणि शेतीबाह्य उत्पन्न-निर्मितीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास आणि त्यांना किमान 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळवून देण्यास मदत करेल, अशी माहिती निता अंबानी आणि बिल गेट्स यांनी दिली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी म्हणाल्या की, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनसोबत भागीदारी करून आम्ही भारतभरातील 1 दशलक्ष महिला उद्योजकांसाठी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. पुढील तीन वर्षांत, हा उपक्रम महिलांना शेती आणि शेतीबाह्य उत्पन्न-निर्मितीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास आणि त्यांना किमान 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळवून देण्यास मदत करेल.

Bill Gates & Neeta Ambani : रिलायन्स फाउंडेशन आमच्या सोबत असल्याचा आनंद – बिल गेट्स

माइक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स म्हणाले, मला आनंद आहे की रिलायंस आमच्या गेट्स फाउंडेशन आणि माझ्या हवामान बदलाशी संबंधित संस्था ब्रेकथ्रू एनर्जी या दोघांसोबत जगातील सर्वात कठीण आव्हानांना तोंड देत आहे. जसे की हवामान बदलाला हाताळणे, महिलांसाठी आर्थिक सशक्तीकरण करणे आणि गरीबांच्या आरोग्य परिणामांमध्ये सुधारणा करणे. पुढील तीन वर्षांत, आम्ही स्वयं-सहाय्यता गटांद्वारे 1 दशलक्ष महिलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करू, असे गेट्स यांनी सांगितले.

Bill Gates & Neeta Ambani :मी भारताच्या नवकल्पना आणि लक्षाभिमुखतेने प्रभावित – बिल गेट्स

बिल गेट्स पुढे म्हणाले की, गेट्स फाउंडेशन भारतात दोन दशकांहून अधिक काळ काम करीत आहे. मी जेव्हा जेव्हा देशाला भेटतो तेव्हा मला आरोग्य आणि विकासाच्या आव्हानात्मक क्षेत्रांमध्ये केल्या जाणार्‍या प्रगतीमुळे खूप उत्साह वाटतो. संसाधनांच्या मर्यादा असूनही, भारताने पोलिओचे निर्मूलन केले आहे, भारताने दारिद्र्य कमी केले आहे, एचआयव्ही संसर्ग आणि बालमृत्यू कमी केले आहे. भारताने स्वच्छता आणि वित्तीय सेवांमध्ये प्रवेश वाढवला आहे. त्यामुळेच मी भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि त्या सर्वाधिक गरजवंतांपर्यंत पुरवण्याच्या त्यांच्या लक्षाभिमुखतेने खूप प्रभावित झालो आहे.

हे ही वाचा :



Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *