नागपूर; महातंत्र वृत्तसेवा : मी पुन्ही येणार… या भाजपककडून करण्यात आलेल्या ट्वीटची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे. आज
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि. २८) माध्यमांशी बोलताना हे ट्विट सहजपणे केलेलं नव्हतं, तर या पाठीमागे काहीतरी कारण असावं असा अंदाज वर्तविला आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत अपयशी ठरल्याने सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, यापूर्वी मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा केंद्राला विचारून घेतलेला नव्हता. राज्यात आरक्षणावरून स्थिती चिघळत आहे. केंद्राने त्यात हस्तक्षेप करणे अपेक्षित असताना ते स्पष्ट नकार देत आहेत. आज जी परिस्थिती आहे, त्याला जबाबदार राज्य सरकार आहे. आरक्षण देण्याची ऐपत नसल्याने आता सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली.
राज्याला अधिकार नसताना त्यांनी कुठल्या भरवशावर मराठ्यांना शब्द दिला? जरांगे पाटील यांनी ४० दिवस सरकारवर विश्वास का ठेवला? राज्य सरकार या काळात केंद्राला भेटायला गेले नाही. साप गेल्यावर आता लाठी मारून काय उपयोग? अशावेळी मी पुन्हा येणार… असं ट्विट केले जात असेल आणि ते डिलिट केले कारण आता मी पुन्हा येऊ शकतं नाही, हे माहिती असल्याने केले असावे असा टोलाही लगावला. एक बाशिंग बाधून तर दोन जण तयार आहेत. सत्ता येणार नसल्याने हे नवरदेव होऊन बसत आहेत.
आताचे सरकार केवळ अध्यक्षांच्या भरवशावर आहे. 2024 मध्ये माविआ सत्तेत येईल त्याला कोणी रोखू शकणार नाही. मात्र या ट्विटवरून नक्कीच काही तरी शिजत आहे. हे सहज केलेले ट्विट आहे, असे मला वाटत नाही असेही वडेट्टीवार म्हणाले.
मराठा समाज लढत आहे, ही वेळ का आली याचे आत्मचिंतन करावे.आरक्षण वेगळा भाग. पण शिक्षणाचे नुकसान करू नये, आयुष्य उध्वस्त करू नये, ही विनंती. महाराष्ट्रात एकच पक्ष सत्तेत आणि विरोधात देखील आहे. दिवा जब बुझता है तो झगमगाता है… तशी यांची स्थिती आहे. उत्तम निसर्गासाठी वाघ ही जगले पाहिजे. दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे कोण कोणाला भेटतो? हे पाहावं लागेल. सुप्रीम कोर्ट 30 तारखेला आपला निर्णय देईलच असा विश्वास वडेट्टीवार यांनी बोलून दाखविला.