PM मोदींना पुण्यात पराभवाची धूळ चारू: काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी थोपटले दंड; भाजपने केला निवडून आणण्याचा निश्चय

पुणे27 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली, तर आम्ही त्यांचा पराभव करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही, असा ठाम निर्धार काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

Related News

पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर भाजपचे पुण्यातील नेते संजय काकडे यांनी या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. भाजपने निर्णय घेतला असेल, तर आम्ही पंतप्रधान मोदींना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू. तूर्त या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. पण आता आम्ही मोदींकडे एका पत्राद्वारे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची मागणी करू, असे ते म्हणाले.

काँग्रेस मोदींचा पराभव करण्यास सज्ज

संजय काकडे यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी आम्ही पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, आम्ही पंतप्रधान मोदींचे पुण्यात स्वागत करू. पण त्यांचा गत 9 वर्षांतील कारभार पाहिला, तर देशातील सर्वच जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे मोदी पुण्यातून उभे राहिले तर त्यांचा पराभव करण्यास काँग्रेस सज्ज आहे.

धंगेकर करणार मोदींशी दोनहात

रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले की, मुंबईतील इंडियाच्या बैठकीत पुण्याची लोकसभा कोण लढवणार हे ठरेल. त्यात पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला तर मी त्यांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. धंगेकर यांच्या या विधानाने ते निवडणुकीत मोदींशी दोनहात करण्यास तयार असल्याचे स्पष्ट होते.

खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे् पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. या जागेवर पोटनिवडणुकीची चर्चा रंगली. पण कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नाही.

खालील बातमी वाचा…

देवेंद्र फडणवीसांमुळे BJP अडचणीत:त्यांची दुकानदारी बंद होण्याची वेळ आली, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचा तिखट हल्ला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजप अडचणीत आल्याचा थेट आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपद मिळवण्याच्या महत्त्वकांक्षेमुळे भाजप अडचणीत सापडला. आता त्यांची दुकानदारी बंद होण्याची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या.

फडणवीसांची दुकानदारी निश्चितच बंद होणार

सुषमा अंधारे यांनी पिंपंरी चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांची दुकानदारी आता बंद होण्याची वेळ आली आहे. त्यांनी प्रचंड कुटनितीने व स्वतःच्या वैयक्तिक मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वकांक्षेसाठी स्वतःचा पक्ष व पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावली. त्यांनी भाजपलाही अडचणीत आले, असे त्या म्हणाल्या. वाचा संपूर्ण बातमी…

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *