BJP आमदाराचा CM शिंदेंना इशारा: प्रश्न चर्चेतून सुटेल, पण दिरंगाईमुळे भावनांचा उद्रेक होईल, महाराष्ट्रात जाटांसारखे आंदोलन होईल!

मुंबई28 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाचा वाद शांत झाल्यामुळे सरकारचा जीव भांड्यात पडला. पण आता सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून त्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. आमचे प्रश्न संवादाने सुटतील असा विश्वास आहे. पण यात दिरंगाई झाली तर आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो, असे हा आमदार म्हणाला आहे.

Related News

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून हा इशारा दिला आहे. त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आमचे प्रश्न संवादाने सुटतील ही अपेक्षा आहे. पण दिरंगाईमुळे आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. याची दक्षता घेऊन धनगर आरक्षणाची बैठक घ्यावी, अन्यथा महाराष्ट्रातसुद्धा जाठ आंदोलनासारखे धनगर आंदोलन उभे राहील. हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय, असे पडळकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

पडळकर यांच्या पत्रातील ठळक मुद्दे

1) अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने धनगर आरक्षणाकरिता उच्च न्यायालयात दाखल याचिकेत (याचिका क्र. ४९१९/२०१७) अ‍ॅड. कुंभकोणी यांची कायम नियुक्ती करणे तसेच न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सुनावणी करता सरकारतर्फे अर्ज दाखल करणे.

2) मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या 10 हजार कोटींच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार महामंडळाची घोषणा करून योजना कार्यान्वित करण्यात यावी व तसेच स्वतंत्र अध्यक्षाची नेमणूक करणे.

3) ‘जे आदिवासींना ते धनगरांना’ याप्रमाणे घोषित केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या 22 योजनांपैकी काही योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधी सुद्धा उपलब्ध झाला नाही त्याबाबत आढावा घेऊन उपायोजना करणे.

4) मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखणे व त्यावर ‘स्वतंत्र कायदा‘ आणून त्यांना संरक्षण देणे, तसेच महसूल रेकॉर्ड मधील आरक्षित चराई कुरणे क्षेत्र वार्षिकी प्रति हेक्टर एक रूपया दर आकारणी करून स्थानिक मेंढपाळांना वाटप करणे.

5) आरेवाडीच्या बिरोबा मंदिर देवस्थानाच्या सर्वांगिण विकासासाठी व भाविकांच्या सोयीसुविंधासाठी आणि सुशोभिकरणासाठी 200 कोटी रूपयांचा निधी द्यावा.

6) महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेले किल्ले वाफगावच्या विकास संवर्धनासाठी सरकारने किल्ला ताब्यात घेऊन ‘किल्ले वाफगाव विकास आराखडा‘ त्वरित तयार करून त्याला मान्यता द्यावी.

7) ज्या पद्धतीने औरंगबादाचे नामांतर छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे तात्काळ व ठोस पाऊले उचलण्यात आली त्याच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्याच्या ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ नामांतरासाठी प्रयत्न व अंमलबजावणीसाठी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश द्यावे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *