माझ्या चारही बाजूने बॉम्ब…, पुणे विमानतळावर 72 वर्षांच्या आजीबाईंची धमकी, अन् उडाला एकच गोंधळ

सागर आव्हाड, झी मीडिया

Pune Airport News: पुण्यातून (Pune) एक खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. एका 72 वर्षीय महिलेने पुणे विमानतळ बाँम्बने (Pune Airport) उडवून देण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईनंतर (Mumbai) आता पुण्यातही असाच प्रकार समोर आल्यानंतर एकच गोंधळ माजला आहे. दरम्यान, धमकी खोटी असून निव्वळ दिशाभूल करण्यासाठी ही चेष्टा केल्याची माहिती समोर येतेय. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune News Today)

माझ्या चारही बाजूला बॉम्ब असल्याचं सांगत पुणे एअरपोर्ट प्रशासनाची धावपळ उडविणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. निता प्रकाश कृपलानी वय ७२, असं महिलेचे नाव आहे. ती पुणे ते दिल्ली या विमानाने प्रवास करणार होती. तर, याबाबत दिपाली बबनराव झावरे वय ३३ या महिला शिपायाने तक्रार दिली होती. 

Related News

गुरुवारी दुपारी 2 वाजल्याच्या सुमारास पुणे एअरपोर्टवर फिस्कींग बुथमध्ये अधिकारी व सहकारी हे सरकारी कर्तव्यावर असताना आरोपी महिला निता प्रकाश कृपलानी वय ७२ वर्षे हिने ‘मेरे चारों तरफ बम लगा है’, अशी अफवा पसरवून खोटी माहिती दिल्याने एअरपोर्ट प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

प्रशासनाने चौकशी केली असता अस काहीच आढळून न आल्याने महिलेविरोधात कायदेशीर तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात, महिलेने निव्वळ मस्करीत अशी धमकी दिल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली होती. पोलिसांनी महिलेला नोटीस दिली असून तिच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त यांनी दिली.

मात्र, आजीबाईंच्या या खोडसाळपणामुळं एअरपोर्ट कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. विमानतळावर सेक्युरिटी चेकिंग दरम्यान वेळ लागत असल्याने महिलेने ही धमकी दिल्याची चर्चा दिली आहे. पण या प्रकाराने विमानतळावरील अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची चांगलीच धावपळ झाली आहे. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *