BRS नेत्याची सडकून टीका: बच्चू कडूंना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत होतो, पण ते राज्यमंत्रीच राहिले,  त्यांनी आपली किंमत घालवली

सांगली44 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी हे एकनाथ शिंदेंसोबत सत्तेत सहभागी झाले असले तरी आता त्यांनी या सरकारविरोधातच दंड थोपटल्याचे दिसत आहे. शेतकरी आणि मजुरांच्या विविध प्रश्नांवरून बच्चू कडू यांनी अमरावती येथे ‘जन एल्गार मोर्चा’ काढला. यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला. मात्र, त्यांच्या या बदललेल्या भूमिकेवर ज्येष्ठ शेतकरी नेते व नुकतेच बीआरएसमध्ये प्रवेश केलेले रघुनाथ पाटील यांनी सडकून टीका केली आहे.

Related News

आता कितीही मोर्चे काढले तरी…

सांगली येथील शेतकरी मेळाव्यात रघुनाथ पाटील म्हणाले, बच्चू कडू यांना आम्ही एकेकाळी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत होतो. मात्र, त्यांनी आता आपली किंमत घालवली आहे. एवढे करूनही ते राज्यमंत्री पदावरच राहीले. बच्चू कडूंनी आमचा अपेक्षाभंग केला आहे. त्यामुळे त्यांनी आता कितीही मोर्चे काढले तरी आपली ती पत ते पुन्हा मिळवू शकणार नाही.

बच्चू कडू आता शुन्य

रघुनाथ पाटील म्हणाले, बच्चू कडू यांना आम्ही चांगला आमदार समजत होतो. ते स्वत:च्या बळावर अपक्ष निवडून आले आहेत. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय कडू यांचे ते भाऊ आहे. पण आता त्यांनी कितीही मोर्चे काढले तरी शेतकऱ्यांमध्ये त्यांची किंमत राहणार नाही. त्यांनी आपली किंमत घालवली आहे. आमच्या दृष्टीने ते शून्य आहेत

दुर्दैवाने अजूनही राज्यमंत्रीपदावरच

रघुनाथ पाटील म्हणाले, बच्चू कडूंना आम्ही उद्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करीत होतो. परंतु दुर्दैवाने ते मुख्यमंत्री पदाऐवजी राज्यमंत्री पदावरच राहिले. मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही, असे ते एकेकाळी बोलत होते. मात्र, आता ते शांत झाले असून मोर्चे काढत आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला.

रघुनाथदादा पाटील यांनी नुकताच भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे. त्यानंतर ते पहिल्यांदाच शेतकरी मेळाव्यात बोलत होते. शेतकरी, शेतमजूर, वंचित घटकांच्‍या विविध मागण्‍यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्‍वात बुधवारी अमरावती येथे बुधवारी मोर्चा काढला. यावरून त्यांनी बच्चू कडूंवर जोरदार टीका केली.

उसदरावरून BRS आक्रमक

दरम्यान, ऊस दरासाठी भारत राष्ट्र समिती राज्यभर आंदोलन करणार असल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले. 15 ऑगस्ट नंतर पंढरपूर येथे आणि 3 सप्टेंबर रोजी संभाजी नगर येथे मांजरा खोऱ्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. महात्मा गांधी जयंतीपासून पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करावी, आणि गुजरात प्रमाणे ऊसाला 5 हजार रुपये दर मिळावा, यासाठी बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा रघुनाथदादा पाटील यांनी केली.

हेही वाचा,

प्रेमाचा फ्लाइंग किस:द्वेषावर उतारा म्हणून राहुल गांधींनी देशाला फ्लाइंग किस दिलाय- संजय राऊतांकडून गांधींच्या कृतीचे समर्थन

द्वेषावर उतारा म्हणून राहुल गांधींनी देशाला फ्लाइंग किस दिलाय. तो प्रेमाचा फ्लाइंग किस होता, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या लोकसभेतील कृतीचे समर्थन केले आहे. प्रेम विसरलेले फ्लाईंग किसचे राजकारण करतात, असा आरोप देखील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. वाचा सविस्तर

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *