भारतीय रेल्वेत बंपर भरती, मुंबई, पुण्यासह तीन शहरांत नोकरीची संधी, आत्ताच करा अर्ज

RRC CR Apprentice Recruitment 2023: रेल्वेत नोकरी करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून भरतीसंदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेत अपरेंटिस यापदासाठी हजारो उमेदवारांची पदे रिक्त आहेत. उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोकरीसाठी अर्ज करु शकतात. उमेदवार आजपासूनच अर्ज करु शकतात तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर आहे. 

भारतीय रेल्वेकडून मध्य रेल्वेत नोकरीची ही संधी चालून आली आहे. रेल्वे अपरेंटिससाठी 2409 पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यातील मुंबई क्लस्टरमध्ये 1649 पदे, पुणे क्लस्टरमध्ये 152 पदे, सोलापूर क्लस्टरमध्ये 76 पदे, भुसावळ क्लस्टरमध्ये 418 पदे आणि नागपूर क्लस्टरसाठी 114 पदांसाठी जागा रिक्त आहेत. 

शिक्षण व वयाचे बंधन 

रेल्वेत नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी एखाद्या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा त्याच्या समकक्ष किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्रही असायला हवे. 

Related News

रेल्वेच्या अधिसूचनेनुसार, या भरती अंतर्गंत अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षांपर्यंत असावे. 

निवड प्रक्रिया कशी करणार?

या पदांसाठी उमेदवाराच्या निवडीसाठी गुणवत्ता यादी दहावीतील गुणांची टक्केवारी (किमान 50% एकूण गुणांसह) + ITI ज्या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप करायची आहे त्या आधारे तयार केली जाईल. 

RRC CR Apprentice Recruitment 2023: उमेदवारांना किती असेल स्टायपेंड

भारतीय रेल्वेत उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना दरमहिन्याला 7 हजार रुपयांचा स्टायपेंड देण्यात येईल. 

RRC CR Apprentice Recruitment 2023 साठी द्यावे लागणार इतके शुल्क

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. उमेदवार डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/एसबीआय चलन इत्यादीद्वारे अर्ज फी भरू शकतात. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *