जालना जिल्ह्यात बसचा अपघात: 42 प्रवाशांसह मुंबईकडे जाणारी एसटी ओव्हरटेकच्या नादात 50 फूट खड्ड्यात कोसळली, 8 जण जखमी

  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Jalna Bus Accident Near Mantha Passengers Injured | Latest Accident News, Pusad Mumbai ST With 42 Passengers Falls Into 50 Feet Ditch After Overtaking

मंठा | जालना4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यात एसटी बसचा अपघात झाला आहे. पुसद येथून मुंबईकडे जाणाऱ्या बसचा जालना जिल्ह्यातील मंठा ते वाटररच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. बसमध्ये एकूण 42 प्रवासी होते. तर त्यातील 8 प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे 50 फूट खोल खड्ड्यात ही बस कोसळली. माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिकांनी धाव घेतली होती. हा अपघात रात्री

ओव्हरटेकच्या नादात अपघात
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. एसटी बस ओव्हरटेक करत असताना 50 फूट खाली खड्ड्यात कोसळली आहे. या अपघातात काही प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरीक मदतीसाठी धावले. तसेच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

मंठा शहराच्या पुढे किलडी फाटा असून त्याठिकाणी एका पुलाचे काम नुकतेच झाले. या दरम्यान रस्त्यावर मोठा ट्रक उभा होता. या ट्रकला ओव्हरटेक करत असताना बस खाली खड्ड्यात कोसळली, अशी माहिती बसच्या कंडक्टरने घटनास्थळावरील लोकांना दिली.

वृद्धांसह बालकांचा बसमध्ये समावेश

बसमध्ये असलेल्या प्रवाशांमध्ये वृद्धांचा देखील समावेश होता. या अपघातात नेमके किती प्रवासी जखमी झाले आहेत, याबाबत सविस्तर माहिती समजू शकलेली नाही. पण घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून प्रवाशांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे. संबंधित घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

8 प्रवाशी गंभीर जखमी
प्रवाशांना तातडीने मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूळ यांनी काही माध्यमांशी बोलताना दिली आहे. तर सुमारे 8 प्रवाशी जखमी असल्याचे त्यांनी सांगितले.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *