अकोल्यात ठाकरे गट आक्रमक: विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाचा कॅन्डल मार्च

अकोला22 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

मलकापूर भागातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) वतीने तुकाराम चौकात कॅन्डल मार्च काढण्यात आला.

Related News

तुकाराम चौक ते मलकापूर मार्गाचे काम रखडले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, यासाठी यापूर्वीही शिवसेना उपजिल्हा प्रमुख मंगेश काळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले होते. मात्र रस्त्याचे काम त्वरित सुरु करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. या भागातील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो.

या भागातील बंद पथदिवे त्वरित सुरु करावेत. रस्त्याच्या कामात या भागाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी रस्त्याच्या मधोमध आहे. रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वी ही जलवाहिनी रस्त्याच्या बाजुला न घेतल्यास आणि पुढे जलवाहिनी फुटल्यास जलवाहिनी दुरुस्तीचे काम करणे अवघड होणार आहे. तसेच रस्ता फोडावा लागणार आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वी या भागाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी रस्त्याच्या बाजूने टाकावी आदी विविध मागण्यासाठी सायंकाळी सात वाजता क्रांती चौक ते तुकाराम चौक दरम्यान कॅन्डल मार्च काढण्यात आला.

या मार्च मध्ये राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, केदार खरे, प्रमोद धर्माळे, अविनाश मोरे, पंकज जायले, मनीष मदनकार, किशोर निमकंडे, स्वप्नील भदे, गणेश चौैधरी, रुद्रराज काळे, प्रफुल्ल आढे, श्रीकृष्ण बायसकर, अतुल राठोड, नम्रता धर्माळे, उमेश शर्मा, अर्जुन गणतिरे, गजानन बोराळे, बंडु सवई, निवृत्ती तिजारे, विवेक पळसपगार, पिंटु इंगोले आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *