केंद्रीय पेट्रोकेमिकल्स संस्थेत बंपर भरती, दहावी उत्तीर्णांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

CIPET Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण दहावी उत्तरीर्णांना केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पात्रता, अर्जाची अंतिम तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणजेच ट्रेनी पदाच्या 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. मशिन ऑपरेटर- प्लास्टिक प्रोसेसिंग असे या पदाचे नाव आहे.

ट्रेनी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षांदरम्यान असावे. एससी, एसटी उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षाची सवलत देण्यात येणार आहे. 

Related News

आयकर विभागात पदवीधरांना नोकरीची संधी, 40 हजारपर्यंत मिळेल पगार

उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क घेण्यात येणार नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजी संस्थेच्या नियमानुसार पगार मिळेल.

नोकरीसाठी उमेदवारांना चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर येथे पाठवले जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना आपले अर्ज 2 सप्टेंबर 2023 च्या आत पाठवायचे आहेत.

उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती

एमपीएससी अंतर्गत  महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब च्या एकूण 823 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) च्या 78 जागा,  राज्य कर निरीक्षक (गट-ब)  च्या 93 जागा, सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) च्या 49 जागा आणि पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) च्या 603 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासांठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. 

SBI च्या मुंबई शाखेत नोकरी आणि 85 लाखांपर्यंत पगार, ‘येथे’ पाठवा अर्ज

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2022 रोजी18 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 544 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. तर मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग उमेदवारांकडून 344 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल. ही परीक्षा अमरावती, छ.संभाजीनगर , नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे येथील परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 1 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *