सिल्लोड: महातंत्र वृत्तसेवा: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाच्या पाठिंब्यासह विविध मागण्यांसाठी सिल्लोड येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सिल्लोड ते अंतरवाली अशी अर्धनग्न दिंडी काढण्यात आली आहे. ही दिंडी सिल्लोड येथून आज (दि.५) दुपारी अंतरवाली सराटी गावाच्या दिशेने रवाना झाली.
अंतरवाली – सराटी येथील उपोषणाला पाठिंबा व मराठा समाजाच्या खालील मागण्यांसाठी सिल्लोड येथील सकल मराठा समाजाच्या वतीने कोलते टाकळी, बदनापूर, रोहेलागड या मार्गे दिंडी जाणार आहे. या दिंडीमध्ये मारोती पाटील वराडे, पानवदोडचे सरपंच प्रमोद दौड, राजू वराडे, दादाराव समिंद्रे, भारत दौड, अक्षय वराडे, भगवान दळवी, गणेश वराडे आदींचा समावेश आहे.
दिंडी रवाना होताना डॉ. निलेश मिरकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पाटील गाढे, डॉ. शेखर दौड, डॉ. संतोष शिंदे, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, प्रमोद (बंटी) शिंदे, आशीष गोराडे, अमोल शेजुळ, पंकज गोराडे, स्वप्निल शिंगारे, व्यापारी महासंघाचे दुर्गेश जैस्वाल, नगरसेवक विठ्ठल सपकाळ आदी उपस्थित होते.
Maratha Andolan : अर्धनग्न दिंडीच्या आंदोलकांच्या खालील प्रमुख मागण्या
कुणबी प्रमाणपत्र देऊन शिक्षण व नोकरीत आरक्षण द्यावे, आंदोलकांवर दाखल सर्व गुन्हे मागे घ्यावे, लाठीचार्जची न्यायालयीन – उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, मराठा विद्यार्थ्यांसाठी तालुका व जिल्हा पातळीवर मोफत वस्तीगृह सुरू करावे, मराठा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क प्रतिपूर्ती योजना सुरू करावी, मराठवाडा वॉटर गेट प्रकल्प राबवून सिंचनासाठी सर्वत्र समान पाणी वाटप करावे, नदी खोरे पातळीवरील पाण्याची समन्यायी वाटप करणे, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती करून अकार्यक्षम पाणी वापरत आणावे, अंतरवाली सराटी तालुका अंबड येथील उपोषणकर्त्यांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्या.
हेही वाचा