चंद्रपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना अटक | महातंत्र
चंद्रपूर, महातंत्र वृत्तसेवा : वरोरा येथे मुलीच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास करीत असतांना पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश  केल्याने वरोरा शहरात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारात जबरदस्तीने ओढणाऱ्या प्रौढ युवक – युवती आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ९ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, सदर गुन्ह्यातील अल्पवयीन गरीब पीडित मुलगी पारिवारिक सदस्यांना सोडून काही दिवसांपूर्वी आपल्या घरातून बाहेर निघाली होती. वरोरा शहरात आल्यानंतर आरोपी मुलीची नजर तिच्यावर पडली. तीने अल्पवयीन पीडित मुलीला आपल्या घरी ठेवून घेतले. त्यानंतर या गुन्ह्यातील दुसरा दलाल आरोपी याने पीडित मुलीला देहव्यापार करण्यासाठी पैशाचे आमिष दाखवले. तिने नकार दिल्यानंतर दोन्ही वयस्क आरोपींनी संगनमताने पैशाचे आमिष दाखवून देह विक्री करण्यास बाध्य केले. तद्नंतर सदर आरोपी मुलगी व दलाल आरोपी हे दोघे इतर अटक आरोपींशी संपर्क करून त्यांच्याकडून रक्कम घेऊन पीडितास देहविक्री करण्यास व ग्राहकासोबत जाण्यास भाग पाडत होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

लैंगिक अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविल्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एक आरोपी अन्य गुन्ह्यात कारागृहात असल्याचे समजते. बाकीच्या सर्व आरोपींना विशेष न्यायाधीश तथा अपर सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात हजर केले असता त्यांना ४ दिवसांची पोलीस  कोठडी सुनावण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचलंत का?

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *