IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात चेतेश्वर पुजारा खेळणार? फोटो झाला व्हायरल

IND vs AUS: IND vs AUS 3rd ODI, Cheteshwar Pujara : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. ह वनडे सिरीज वर्ल्डकपच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानण्यात येतेय. ही सिरीज 2-0 अशी टीम इंडियाने जिंकली असून तिसरा सामना 27 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचं कमबॅक झालं आहे. अशातच चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) चा रोहितसोबत एक फोटो व्हायरल झाल्याने तिसऱ्या वनडे सामन्यात पुजाराची एन्ट्री होणार का, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. 

आज रंगणार तिसरा वनडे सामना

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे सिरीज टीम इंडियाने जिंकली असून ती आता राजकोटमध्ये पोहोचलीये. सिरीजतील शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी राजकोटच्या SCA स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यातून कमबॅक करणार आहे. रोहित सिरीजतील पहिल्या दोन सामन्यांचा भाग नव्हता. 

रोहितचा पुजारासोबतचा फोटो व्हायरल

तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचा एक फोटो व्हायरल झालाय. यामध्ये तो जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मासोबत फ्लाइटमध्ये दिसतोय. यावेळी पुजारा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतोय. भारत-ऑस्ट्रेलिया सिरीजतील तिसरा एकदिवसीय सामना ज्या मैदानावर होणार आहे ते चेतेश्वर पुजाराचं होम ग्राऊंड आहे. तिसऱ्या वनडे सामनात पुजारा खेळणार नाहीये. केवळ राजकोटला जातानाचा त्याचा हा फोटो व्हायरल झाल्याने चाहत्यांनी ही अटकळ बांधली.

Related News

तिसऱ्या वनडे सामन्यात हे खेळाडू करणार कमबॅक

कर्णधार रोहित सोबत रोहित व्यतिरिक्त महान फलंदाज विराट कोहली देखील तिसऱ्या वनडेतून टीम इंडियात परतणार आहेत. हे सर्व खेळाडू पहिल्या दोन वनडे सामन्यांचा भाग नव्हते. त्यांच्याशिवाय गोलंदाज कुलदीप यादवही टीममध्ये परतणार आहे. 

तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी खेळाडू पडले आजारी

तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्रकार परिषद घेतली.  काही खेळाडूंना व्हायरल फिव्हर झालाय तर काही खेळाडू आपापल्या घरी गेले असल्याचं रोहितने सांगितलंय. तिसऱ्या वनडे सामन्याच्या भारतीय संघात निवडीसाठी केवळ 13 खेळाडू उपलब्ध आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात खेळणारे मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर तसंच एकही सामना खेळणारा हार्दिक पांड्या आपापल्या घरी गेले आहेत. 

याशिवाय शुभमन गिलला विश्वचषक स्पर्धेपूर्वी आराम देण्यात आला आहे. एशिया कप दरम्यान दुखापत झालेला अक्षर पटेल उपचार घेतोय. पत्रकार परिषेदत रोहित शर्माने आपले काही खेळाडू अस्वस्थ असून तिसऱ्या सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध नसल्याचं सांगितलं. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *