‘छगन भुजबळांनी ओबीसींची फसवणूक केली, मी विश्वासाने सांगतो की…’; विजय वडेट्टीवार यांची सटकून टीका!

Vijay Vadettiwar Zee 24 Taas Interview:  छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसींची फसवणूक केली, त्यामुळे जनता त्यांना पुन्हा निवडून देणार नाही, असं भाकित विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केलं आहे. झी 24 तासला दिलेल्या ब्लॉक अँड व्हाईट मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ज्यांना तुम्ही अभद्र म्हणताय, त्यांच्या बाजूला तालमीचा पैलवान किंवा गुरूजी जाऊन बसलेत, अशा परिस्थितीत तुम्ही विरोधक म्हणून भुजबळांचा सामना कसा करणार? असा सवाल विजय वडेट्टीवार यांना विचारला गेला.

काय म्हणाले Vijay Vadettiwar?

तिथं माणूस वैचारिक लढाई करतो, तिथं माणूस संभाळून बोलतो. त्यांनी आता स्वत:चा दृष्टीकोन बदलला आहे. त्यांचा प्लॅटफॉर्म आता वेगळा झालाय. भुजबळांची ही भूमिका महाराष्ट्रातील ओबीसी समजाला धक्का देणारी आहे. ज्या ओबीसींसाठी ते लढत होते, ज्याप्रकारे ते सत्ताधाऱ्यांवर ओबीसींचा चेहरा म्हणून प्रहार करत होते. महाराष्ट्रातील ओबीसीची समाजाचा विश्वास त्या चेहऱ्यावर होता. तो विश्वास घातकीपणा भुजबळ यांनी केला आहे. मी विश्वासाने सांगेल की, भुजबळसाहेबांना जनता पुन्हा निवडून देणार नाही. त्यांनी जनतेचे फसवणूक केली, असं वडेट्टीवार (Vijay Vadettiwar On Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं आहे.

वैयक्तिक टार्गेट करत असेल तर…

राणेंनी टीका केली तर काय कराल? का असा प्रश्न त्यांना विचारला गेला. आमची वैयक्तिक दुश्मनी नाही. माझ्या पक्षाच्या विरोधात कोण बोलत असेल. मला कोणी वैयक्तिक टार्गेट करत असेल तर मी देखील त्यांना वैयक्तिक टार्गेट करणार मी गडचिरोलीसारख्या नक्षली भागातून आलोय. काम करताना चुक झाली असेल तर त्यांच्या कामावरून प्रश्न करू. आम्ही विरोधक म्हणून चुकत असेल तर त्यांनी आमच्यावर बोलावं, असं म्हणत वडेट्टीवार यांनी सार्वजनिकदृष्ट्या मत व्यक्त केलंय.

Related News

आणखी वाचा – Maharastra Politics: मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका, पाहा एकनाथ शिंदे काय म्हणाले?

संकटाच्या काळात विदर्भाने साथ

काँग्रेसच्या संकटाच्या काळात विदर्भाने साथ दिली. इंदिरा गांधी यांच्या वाईट काळात विदर्भातील 11 च्या 11 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तिथं गांधींचा विचार आहे. विदर्भात काँग्रेसला चांगले दिवस आहे. येत्या काळात महाराष्ट्राची वाट ही विदर्भातून जाईल, असं म्हणत त्यांनी आपलं रोखठोक मत मांडलं आहे. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *