छत्रपती संभाजीनगर : पाण्याच्या टँकरला धडकून दुचाकीस्वार जागीच ठार | महातंत्र
हतनूर; महातंत्र वृत्तसेवा : भरधाव दुचाकी आणि उभ्या पाण्याचा टँकरला धडकेनंतर झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि २९) सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड तालुक्यातील हतनूर जवळील टोल नाक्याजवळ घडला. याप्रकरणी ग्रामीण कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करीमोददीन शेख (वय २६ वर्ष, रा संतोषी माता नगर मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,करीमोददीन शेख हा त्याचा मित्राची  दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगर कडून धुळे येथे जात होता. दुजाकी क्रमांक (एम एच २० एफ एन ९९४९) ने जात होता यावेळी पाण्याचा टँकर क्रमांक (एम एच ०४ बी जी ४९६९). या उभ्या टँकर ला जाऊन धडकला या अपघातात करीमोददीन हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच हतनूर पोलीस दुर क्षेत्राचे  बीट जमादार संजय आटोळे, पोहेकॉ कैलास करवंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरूणाला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले होते मात्र डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे घोषित केले.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *