महातंत्र ऑनलाईन डेस्क : चीनने नुकताच नवीन नकाशा प्रसिद्ध केला आहे. यात भारताशी असलेल्या चीनच्या दक्षिण सीमेवरील अरुणाचल प्रदेश, डोकलाम, अक्साई चीन हा भाग चीनमध्ये दाखवण्यात आला आहे. पण फक्त भारतच नाही, तर इतर चार देशांच्या नकाशांत चीनने असाच खोडसाळपणा केला आहे. या चारही देशांनी चीनचा निषेध केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. (China Map)
चीनने सतत दक्षिण चिनी समुद्रावर दावा सांगितला आहे. यातून इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेइ आणि फिलिपाईन्स या देशांशी चीनचा सततचा संघर्ष सुरू आहे. फिलापाईन्सचा काही भाग चीनने नकाशात आपल्या हद्दीत दाखवला आहे. यावर फिलपाईन्सने तीव्र आक्षेप घेतला आहे.
फिलिपाईन्सने म्हटले आहे की, “फिलिपाईन्सचा भाग असलेल्या आणि फिलिपाईन्सच्या समुद्री सीमेवर चीनने हक्क सांगितला आहे. याला आंतरराष्ट्रीय कायद्यांत कोणतेही स्थान नाही. हे स्वयंघोषित सार्वभौमत्व आम्ही मान्य करत नाही.”
Vietnam says China’s official map released this week violates its sovereignty over the Spratly and Paracel Islands and jurisdiction over its waters https://t.co/QsKGyTHmuS
— Bloomberg (@business) August 31, 2023
तर मलेशियाने चीनचा नकाशा एकतर्फी असून तो आमच्यावर बंधनकारक नाही, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.
तर चीनने व्हिएतनामचा पारासेल आणि स्पार्टली या दोन बेटांवर आणि त्यांच्या आजूबाजूच्या समुद्री सीमांचा भाग स्वतःच्या नकाशात दाखवला आहे. व्हिएतनामने हा नकाशा आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. (China Map)
तैवानने चीनवर सतत दावा केला आहे. तैवान हे स्वयंशासित बेट आपलाच भाग असल्याचे या नकाशात दाखवले आहे. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने जेफ लिऊ यांनी आम्ही चीनचा भाग नाही, असे ठणकावले आहे. “चीनने तैवानच्या सार्वभौमत्वाशी नेहमीच खोडसाळपणा केला आहे. पण यामुळे आमच्या देशाचे अस्तित्व नकारता येणार नाही.”
हेही वाचा