आजपासून वर्ल्डकपसाठी रंगीत तालीम: आशिया कपमध्ये आज पाक-नेपाळ सामना, 2 सप्टेंबरला भारत-पाक मिनी फायनल

दिव्य मराठी नेटवर्क | कोलंबो/बंगळुरू9 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

आशिया कप स्पर्धेत सहभागी भारतासह पाच संघांची विश्वचषकासाठी आपल्या १५ खेळाडूंच्या निवडीसाठी खास असणार नजर

Related News

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आशिया कप क्रिकेट स्पर्धेला आज बुधवारपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेत पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. या वनडे फाॅरमॅटच्या आशिया चषकाच्या माध्यमातून आता सहभागी संघांना आगामी आयसीसी वर्ल्डकपची तयारी करण्याची संधी आहे. यामुळे आशिया कप ही वर्ल्डकपसाठीची रंगीत तालीम मानली जात आहे. याच स्पर्धेतून टीम इंडियासह पाच संघ वनडे विश्वचषकासाठीच्या आपल्या स्टार १५ जणांची नावे निश्चित करू शकणार आहेत. यामुळे या स्पर्धेतील दर्जेदार कामगिरीतून युवांना वर्ल्डकपसाठी संघातील आपले स्थान निश्चित करण्याची मोठी संधी आहे. यंदा भारतामध्ये ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

आयसीसी इव्हेंटनंतर जगातील दुसरी सर्वात मोठी मानली जाणारी आशिया कप स्पर्धा बुधवारपासून सुरू होत आहे. आशियाई भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तान संघांना यातून वनडे विश्वचषकासाठी आपली तयारी करण्याची संधी आहे सुनील गावस्कर म्हणाले होते की, भारताच्या १९८३, १९८५, २०११ च्या संघात अव्वल दर्जाचे अष्टपैलू खेळाडू होते. फलंदाजीबरोबरच ७-८ षटके टाकणारे खेळाडू होते. गोलंदाज हे फलंदाजीतही तरबेज होते.

दीड वर्षापूर्वीच्या नियोजनाला आता दुखापतीने आणले अडचणीमध्ये : द्रविड

भारतीय संघातील मधल्या फळीतील दुबळ्या बाजूवर सातत्याने चर्चा केली जात आहे. मात्र, आम्ही यामध्ये सुधारणा करण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून मेहनत घेत आहेत. यातूनच आम्ही यादरम्यान जवळपास तिघांना चाैथ्या आणि पाचव्या स्थानावरून खेळण्यासाठीची संधी दिली. यात श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि ऋषभ पंत आघाडीवर होते. मात्र, याच प्लॅनिंगला दरम्यान दुखापतीचा फटका बसला. या ठिकाणी खेळताना दोघे जण जायबंदी झालेे. तसेच ऋषभ पंत हा कारच्या अपघातामध्ये गंभीर स्वरुपात जायबंदी झाला. त्यामुळे आम्हाला सतत प्रयोग करावे लागले. तिघांवरही शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या खेळाडूंचा वापर केला. आम्हाला विश्वचषकासाठी तयार राहावे लागले. विश्वचषकात काय होईल हे आम्हाला माहीत नाही. ते होणार आहे. म्हणूनच आम्ही दोन-तीन खेळाडूंना क्रमवारीत सतत संधी दिली. जेव्हा तुमच्याकडे प्रमुख खेळाडू नसतात तेव्हा इतरांना संधी द्यावी लागते, असे कोच राहुल द्रविड म्हणाला. संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. यापूर्वी काही खेळाडू कर्णधार राहिले आहेत. काहींनी अलीकडच्या काळात कर्णधारपद भूषवले आहे,असेही तो म्हणाला.

खेळाडूंच्या गंभीर दुखापतीमुळे गतविजेता श्रीलंका अडचणीत; उद्या बांगलादेशचे आव्हान

यजमान श्रीलंका संघ आता दुसऱ्यांदा आशिया कप आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, संघासाठी सध्या खेळाडुूंची दुखापत अडचणीची ठरत आहे. टीमचा वेगवान गोलंदाज चमीरा खांद्याच्या दुखापतीमुळे आणि दिलशान मधुशंका स्नायूच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. वानिंदू हसरंगाचेही खेळणे अनिश्चित आहे. श्रीलंका संघ उद्या गुरुवारपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे.

राहुल अनफिट; दोन सामन्यांना मुकणार

यष्टिरक्षक फलंदाज लोकेश राहुल अद्यापही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे त्याला आशिया कपमधील सुरुवातीच्या दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे. यातून तो पाकिस्तान आणि नेपाळविरुद्ध सामन्यात सहभागी होणार नाही. “ राहुल दुखापतीतून बरा होत आहे.मात्र, तो कँडीतील सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाही. तो पुन्हा एनसीएमध्येच राहणार आहे. आम्ही ४ सप्टेंबरला त्याच्या स्पर्धेतील सहभागाबाबत निर्णय घेऊ,” असे द्रविड म्हणाला. त्यापैकी पुढील काही दिवसांसाठी भारताचा स्पर्धेतील पहिला सामना २ सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी भारत आणि नेपाळ सामना होणार आहे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *