‘Come Back Later’…आनंद महिंद्रांचे ट्विट चर्चेत | महातंत्र
महातंत्र ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. विविध विषयांवर पोस्ट करत आपलं मत मांडत असतात. त्‍याचे नेहमीच हटके ठरणारे ट्विट नेहमी चर्चेत असते. सध्या त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोवर त्यांनी कम बॅक लेटर असे (Come Back Later) कॅप्शन दिले आहे. या त्यांच्या कमेंटमुळे हा फोटो खूप चर्चेत आला आहे. जाणून घेऊया या फोटोत काय खास आहे. (Anand Mahindra)

आनंद महिंद्रांनी शेअर केलेला सिंहाचा फोटो व्हायरल का होतोय?

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी रविवारी (दि. ६) त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला. यामध्ये सिंह आरामात झोपलेला दिसत आहे; पण हा फोटो व्हायरल होण्याचे कारण म्हणजे हा सिंह जमिनीवर किंवा गुहेत झोपलेला नसून, झाडाच्या फांद्यामध्ये हात पाय पसरून  झोपला आहे. सिंहाचा हा वेगळ्या छबीतील फाेटाे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आनंद महिंद्रांचा फोटोवरील चर्चेतील ‘ते’ कॅप्शन

सिंहाच्या फोटोवर शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी एक कॅप्शन दिले आहे. त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘Come back later. I’m busy.‘ तसेच #Sunday असा या फोटोला हॅशटॅग देखील त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे हा फोटो त्यांनी रविवारी शेअर केला आहे. त्यामुळे विकेंडला आरामात झोपलेला हा सिंहाचा फोटो आहे असे या पोस्टमधून दिसून येते. ट्विटरवर पोस्ट केलेल्या या फोटोवर अनेक यूजर्सच्या मजेशीर कमेंटचा पाऊस पडत आहे.

हेही वाचा : Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *