शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काँग्रेसनं नाहीतर, देवेंद्र फडणवीसांनी काढावा : विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar on Sharat Pawar Statement : अजित पवार (Ajit Pawar) आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणून पक्षात फूट पडली असं म्हणायचं कारण नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Political Updates) पुन्हा एकदा खळबळ माजली. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar Reaction) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसनं शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ काढावा, यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी याचा अर्थ काढावा, शरद पवार बोलत असतील तर याचा अर्थ आम्ही का काढावा? शरद पवार महाविकास आघाडीसोबतच आहेत, असा ठाम विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला आहे. 

विजय वडेट्टीवार बोलताना म्हणाले की, “काँग्रेसनं शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ काढावा. यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी याचा अर्थ काढावा. शरद पवार बोलत असतील तर याचा अर्थ आम्ही का काढावा? शरद पवार महाविकास आघाडीसोबत आहेत. भाजपनं राजकारण सडवलंय. जनतेचा विश्वासघात या सर्वांनी केलेला आहे. यांची जागा वेळेप्रसंगी जनता दाखवेलच. महाविकास आघाडी म्हणून जे आमच्यासोबत आहेत, ते आमच्यासोबत आहेत.”

Related News

“शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय? हे सांगता येणार नाही. उद्या त्यांच्या पक्षाच्या फुटीचं प्रकरण निवडणूक आयोगात जाईल, कोर्टात जाईल. त्यामुळे तो त्यांच्या रणनितीचा भाग असू शकतो. आमच्या पक्षात फूट पडलेली नाही, हे जाहीररीत्या सांगावं”, असं वडेट्टीवार म्हणाले. “प्रत्येक पक्षाला आपापल्या परीनं तयारी करावी लागते. निवडणुकीमध्ये असे प्रसंग येतात की, शेवटच्या टप्प्यामध्ये आघाडी तुटते. त्यासाठी प्रत्येक पक्षाला रणनिती तयार ठेवावी लागते.”, असं वक्तव्यही वडेट्टीवार यांनी केलं आहे. 

“शरद पवार यांच्या वक्तव्यानं आम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. आमच्या सोबत अनेक आघाड्या आहेत. शरद पवारांसह इतरही अनेक आघाड्या आहेत. इंडिया आघाडीच्या पाठीमागे जनता उभी आहे. या सरकारची लोकप्रियता संपली आहे, हे सरकार ED, CBI च्या जोरावर चालणारं सरकार आहे.”, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. 

शरद पवार नेमकं काय म्हणाले? 

अजित पवार यांच्याबद्दल शरद पवारांनी अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे. “अजित पवार आमचेच नेते आहेत, काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचं कारण नाही,” असं शरद पवार म्हणाले. बारामतीl पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं. पण शरद पवारांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. शरद पवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? याबाबत चर्चा रंगल्या आहेत. 

सना खान प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी : विजय वडेट्टीवार 

“सना खान प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमून चौकशी केली पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीत आमच्या आमदारांना उघड बोलावलं जात आहे. तर भाजपच्या आमदारांना लपून छपून बोलावलं जातं आहे. या प्रकरणात भाजपचे मोठे मोठे नेते आहेत. त्यांची नावं आम्ही आता घेणार नाही. जी नावं सना खान प्रकरणात समोर येत आहेत, ती सत्ताधाऱ्यांच्या जवळची नावं आहेत. त्यामुळे तपासात पुढे ती नावं समोर येतील, कोणीही सुटणार नाही”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. 

 

अजित पवारांची लवकरच घरवापसी होईल : नाना पटोले

“शरद पवार आणि अजित पवारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बैठकांचा सेसेमिरा सुरू आहे. ते पाहुन शरद पवारांना अशी वक्तव्य करुन अजित पवारांना आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न करायचा आहे, असं दिसून येतंय. तसेच, आजच्या वक्तव्यावरुन अजित पवारांची घरवापसी होईल, असंही मला वाटतंय.”, असं नाना पटोले म्हणाले. यासंदर्भातील निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे. शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाबाबतच्या निर्णय ते योग्य पद्धतीनं घेतील, आम्हाला त्यात बोलण्याची गरज वाटत नाही, असंही नाना पटोले म्हणाले. 

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *