एका शतकानंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये परतू शकते: राष्ट्रकुल-आशियाईमध्ये यशस्वी चाचणी, नवरात्रीमध्ये 100 सदस्य घेणार निर्णय

  • Marathi News
  • Sports
  • Cricket May Return To Olympics After A Century Commonwealth Asiatic Trial Successful, 100 Members To Decide On Navratri

मुंबईएका दिवसापूर्वी

  • कॉपी लिंक

राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेत क्रिकेटची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आता चाहत्यांना ऑलिम्पिकमध्ये हा खेळ पाहता येणार आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यास १९०० नंतर पहिल्यांदाच क्रिकेट खेळ या मेगा इव्हेंटमध्ये पाहायला मिळेल. म्हणजेच शतकाहून अधिक काळानंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये परतू शकतो. मात्र, २००८ पासून क्रिकेटच्या समावेशाबाबत सतत चर्चा सुरू होती.

Related News

आता नवरात्रीच्या काळात यावर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. जर सर्व काही नियोजनानुसार झाले तर १२८ वर्षांनंतर खेळाच्या महाकुंभात टी-२० पद्धतीचे क्रिकेट खेळले जाईल. येत्या १५-१६ ऑक्टोबर रोजी १०० सदस्यांसह आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची (आयओसी) बैठक होणार आहे. यामध्ये २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. अध्यक्ष थॉमस बाक यांच्या नेतृत्वाखाली चर्चा केली जाईल. अनेक देश क्रिकेटच्या समावेश करण्याच्या बाजूने असू शकतात.

अमेरिकेतील क्रिकेटच्या वाढत्या क्रेझमुळे ऑलिम्पिकमधील दावा मजबूत
जवळपास दोन दशकांपासून आयओसीचे विपणन आणि प्रसारण अधिकारांचे संचालक मायकेल मेने यांच्या मते, ऑलिम्पिक प्रवेशासाठी क्रिकेट हा सर्वाधिक पसंतीचा खेळ आहे. अमेरिकेतील क्रिकेटच्या वाढत्या क्रेझचा दाखला देत पायने म्हणाले की, या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्यासही मदत होईल. तेथील काही मोठ्या टेक कंपन्यांनी मेजर लीगमध्ये गुंतवणूक केली आहे. पायने म्हणतात, क्रिकेटसाठी एक फायदा म्हणजे २०३२ ऑलिम्पिक ऑस्ट्रेलियात होणार आहे, जिथे क्रिकेट हा प्रमुख खेळ आहे. त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम देखील आहेत.

“लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष केसी वासरमन, एक चतुर नेते आहेत. त्यांना क्रिकेटची क्षमता दिसते. उपखंडाच्या विशाल बाजारपेठेत आयओसीच्या प्रवेशाव्यतिरिक्त क्रिकेटप्रेमी भारतीय आणि दक्षिण आशियाई रसिकांना भुरळ घालण्यात रस आहे. पायने म्हणाले, “ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्यास मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आकर्षित होतील. भारत-पाकिस्तान आणि इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे सामने फायदेशीर ठरतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये टी-२० फॉरमॅटचा समावेश करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये महिला आणि पुरुष गटातील ५-५ संघांचा समावेश करता येईल.

१९०० ऑलिम्पिकनंतर क्रिकेट झाले बाहेर
दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला. १९०० मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ४ संघ सहभागी झाले होते. त्यात सुवर्णपदक विजेता ब्रिटन, रौप्यपदक विजेता फ्रान्स, बेल्जियम आणि नेदरलँड संघाचा समावेश होता. त्यानंतर क्रिकेट ऑलिम्पिकमधून बाहेर पडले. लॉस एंजेलिस येथे २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसह फ्लॅग फुटबॉल तसेच कराटे, किक बॉक्सिंग, बेसबॉल-सॉफ्टबॉल, लॅक्रोस, ब्रेक डान्स, स्क्वॅश, मोटर स्पोर्ट््स हे खेळ प्रतीक्षेत आहेत.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *