Critical Phase of Chandrayaan-3 : चंद्रयान-३ मोहिमेचा सर्वांत महत्वाचा टप्पा ९ ऑगस्ट पासून सुरु होईल – इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ | महातंत्र








महातंत्र ऑनलाईन डेस्क : चंद्रयान-३ मोहिमेचा सर्वांत महत्वाचा टप्पा ९ ऑगस्ट पासून सुरू होईल, जेव्हा यान १०० किमी अंतरावरुन चंद्राच्या जवळ जाऊ लागेल. चंद्रयान-३ ची कक्षा निश्चिती प्रक्रिया ही ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान, चंद्राच्या १०० किमी वर्तुळाकार कक्षेत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकूणच भारताची तिसरी चंद्रयान मोहिम सध्या अतिशय चांगल्या स्थितीत आहे, असे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले आहेत. (Critical Phase of Chandrayaan-3)

चांद्रयानाने पाठवली चंद्राची पहिली छायाचित्रे

चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्याबरोबर चांद्रयान कामाला लागले असून यानाने चंद्राची जवळून टिपलेली छायाचित्रे हाती आली आहेत. ‘इस्त्रो ने ही छायाचित्रे जारी केली आहेत. भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या चांद्रयान- ३ कडे अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. शनिवारी चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. आता चंद्राभोवती फेल्या भारत ते एकेक कक्षा ओलांडत चंद्राच्या जवळ जाईल व २३ ऑगस्टच्या आसपास चंद्रावर उतरेल. (Critical Phase of Chandrayaan-3)

पण शनिवारी कक्षेत प्रवेश केल्यापासून है यान कामाला लागले आहे. त्याने चंद्राची विहंगम छबी टिपण्यास सुरुवात केली असून रविवारी काही व्हिडीओ व छायाचित्रे त्याने पृथ्वीवर पाठवली. ‘इस्त्रो’ने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात चंद्राभोवती फेरी मारताना प्रकाशित भागाकडून अप्रकाशित भागाकडे जाताना टिपलेल्या छायाचित्रांच्या व्हिडीओत समावेश आहे. त्यावर चंद्राच्या पृष्ठभागावरील खड्डे अत्यंत स्पष्ट दिसत आहेत. तसेच चांद्रयानाचा काही भागही दिसत आहे. (Critical Phase of Chandrayaan-3)

हेही वाचलंत का?











Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *