टीका: 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा नेता योग्य जागी, अजितदादांचे कौतुक 2024नंतरही कायम ठेवा; संजय राऊतांचा अमित शहांना टोला

मुंबई43 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आपण एकत्र व्यासपीठावर आलो आहोत. अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला’, असे वक्तव्य काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील कार्यक्रमात केले होते. त्यावरून आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अमित शहांना जोरदार टोला लगावला.

Related News

दादा नक्की कुठे आहेत?
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, अमित शहा आता अजित पवारांचे जे कौतुक करत आहेत, हेच कौतुक त्यांनी 2024 नंतरही कायम ठेवावे. दादा योग्य जागी आहेत, असे अमित शहांनी 2024 नंतरही बोलावे.

तसेच, दादा नक्की कुठे आहेत?, असा सूचक सवालही संजय राऊत यांनी केला. सध्या या देशाचे आणि राज्याचे राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यानुसार योग्य आणि अयोग्य याच्या व्याख्या कोणी ठरवू नयेत, अशी टीका संजय राऊतांनी केली

सिंचन घोटाळा योग्य जागी

संजय राऊत म्हणाले, याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील याच नेत्यांना कालपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी म्हणत होते. एनसीपी म्हणे नॅचरल करप्ट पार्टी अशी टीका करत होते. या पक्षाच्या नेत्यांनी 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला, असा आरोप मोदी करत होते. आज याच सिंचन घोटाळ्याचा नेता योग्य जागी आहे, असे अमित शहा म्हणत आहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

अमित शाह काय म्हणाले होते?
केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी पुण्यात केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था (CRCS) कार्यालय या पोर्टलचे अनावरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला. अमित शहा म्हणाले, ‘अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आपण एकत्र एकाच व्यासपीठावर आलो आहोत. अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला.’

संबंधित वृत्त

राष्ट्रवादीत पुन्हा फुटीची चर्चा:जयंत पाटील आणि आमचा डीएनए एकच, ते पळून जाणाऱ्या नेत्यांपैकी नाहीत; सजंय राऊतांची प्रतिक्रिया

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही लवकरच सत्तेत सहभागी होणार, अशा चर्चांनी रविवारी राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यावर जयंत पाटील आणि आमचा डीएनए एकच आहे. ते पळून जाणारे नेते नाहीत, अशी प्रतिक्रिया आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, आपला नेता, पक्ष संकटात असताना पळून जाणाऱ्या डरपोक नेत्यांपैकी जयंत पाटील नाहीत. जयंत पाटील हे पळपुटे नेते नाहीत. ते डरपोक नाहीत. जयंत पाटील आणि आमचा डीएनए एकच आहे. पाटील पळून जाणारे नाहीत. वाचा सविस्तर

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *