जिल्हयातील बंधारे, तलाव कोरडे: अनेक गावात सिंचनासह पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई

छत्रपती संभाजीनगर12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

ऑगस्ट महिना संपत आलातरीही अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नसल्यामुळे जिल्हयातील कोल्हापुरी बंधारे,पाझर तलाव,सिंचन तलाव कोरडे पडले आहेत. यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमार्फत 585 कोल्हापुरी बंधारे,698 तलाव उभारण्यात आलेले आहेत. यामध्ये 613 पाझर तलाव, 42 गाव तलाव तर 43 सिंचन तलावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात बंधारे,तलावांमध्ये पाणी असते परंतु, आजमितीला जिल्हयामध्ये पाऊसच झालेला नसल्यामुळे हे सर्व बंधारे,तलाव कोरडे पडलेले आहेत. साधारणपणे ऑक्टोंबर महिन्यामध्ये कोल्हापुरी बंधार्‍यांमध्ये दरवाजे टाकण्यात येतात. परंतु, यावर्षी अद्यापपर्यत पाऊसच पडलेला नसल्यामुळे मोठी अडचण झालेली आहे. भविष्यात चांगला पाऊस पडला तरच या बंधाऱ्यांमध्ये पाणी येणार आहे.

दरवाज्यांची खरेदी पण पाणीच नाही

गेल्या अनेक वर्षानंतर कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी दरवाजे टाकण्यासाठी 3 कोटी 81 लाख रुपये आलेले आहेत. यातून दरवाज्यांची खरेदी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दरवाज्यांची तालुकास्तरावर खरेदी करण्यात येणार असल्यामुळे वेळेत खरेदी होणार आहे. आजपर्यंत 762 दरवाजे साईडवर पोहचले असल्याचे सिंचल विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष चौधरी यांनी सांगितले. यावर्षी दरवाजे येऊन पडलेले असतांना पाऊस नसल्यामुळे बंधाऱ्यांमध्ये पाणीच नाही.

जिल्हयात 41 गावात 41 टँकर

जुलैमध्ये झालेल्या पावसावर पिक पेरणी झाली आहे. ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. पावसाळा सुरु होऊन जवळपास तीन महिने उलटले तरीही अद्याप पर्यंत दमदार पाऊस झाला नसल्याने ओढे, नद्यांना पाणी नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीपातळी खालावली असून गावाना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जिल्ह्यातील 41 गावामध्ये 41 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या टँकरला 79 खेपा मंजूर असून 74 खेपा होत आहेत. तसेच 70 गावांमधील 73 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गोलटगांव, सांजखेडा, एकलहरा, महमंदपूर, पांढरी तांडा, पांढरी पिंपळगांव, नागोण्यांची वाडी, घारदोन, कन्नीनाई तांडा, बेगणाई तांडा, फुलंब्री- दरेगाव दारी, पैठण- आडुळ बु, आडुळ खु. अंतरवाली खांडी, ब्राम्हणगांव, ब्राम्हणगांव तांडा, गेवराई मर्दा, , गेवराई , अब्दुल्लापुर, होणोबाचीवाडी, एकतुनी, रजापूर, हिरापूर, थापटी तांडा, कडेठाण बु, व वाडया तांडे, पारुंडी, पारुंडी तांडा, आडगाव जावळे, दाभरुळ, कडेठाण खुलताबा तसेच सिल्लोड- अंधारी, गंगापूर- सुलतानाबाद अशा 41 गावे, वाडयांना 41 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *