नृत्यांगणा गौतम पाटीलच्या वडिलांचा मृत्यू: पुण्यात अंत्यसंस्कार; काही दिवसांपूर्वीच धुळ्यात बेवारस स्थितीत सापडले होते

पुणे30 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

अवघ्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या वडिलांचा सोमवारी मृत्यू झाला. ते काही दिवसांपूर्वीच बेवारस स्थितीत सापडले होते. बिबवेवाडी भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

Related News

गौतमी पाटीलचे आई-वडील विभक्त राहतात. गौतमी तिच्या आईबरोबर राहते. गत काही दिवसांपासून तिचे वडील रवींद्र पाटील यांची प्रकृती खालावली होती. ते धुळ्यालगतच्या सूरत महामार्गावर दुर्गेश चव्हाण यांना बेवारस स्थितीत सापडले होते.

प्रारंभी त्यांची ओळख पटली नव्हती. त्यांना धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याकडे सापडलेल्या आधार कार्डनुसार चव्हाण यांनी त्यांच्या मुलीशी म्हणजे गौतमीशी संपर्क साधला. तिने उपचारासाठी पुण्यात आणले. तिथे त्यांचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. त्यांना बिबवेवाडी भागातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर धनकवडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुसरीकडे, पतीच्या व्यसनाला कंटाळून गौतमीची आई तिला लहानपणीच पुण्याला घेऊन गेली होती. तिथे गौतमीने डान्स क्लास लावला. तिने ऑर्केस्ट्रामध्येही काम केले. तिच्या आयुष्यात अनेक चढऊतार आले. पण ती खचली नाही. सध्या ती आपल्या कलेच्या जोरावर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे.

वाचा महाराष्ट्रातील घडामोडींशी संबंधित बातमी…

एका दिवसात काढलेला आरक्षणाचा जीआर कोर्टात टिकणार नाही, सरकारची भूमिका:जरांगे म्हणतात, जीआर काढायला अडचण नाही

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तात्काळ अध्यक्षादेश काढावा, अशी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे मराठा आंदोलन अद्याप संपेल असे वाटत नाही. तर दुसरीकडे एका दिवसात आरक्षण शक्य नाही, अशी सरकारची भूमिका आहे. एका दिवसात काढलेला आरक्षणाचा जीआर कोर्टात टिकणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे एक शिष्टमंडळ आज दुपारी साडेबारा वाजता मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. मात्र, त्या आधी अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या संदर्भातील जीआर काढायला अडचण नसल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. वाचा संपूर्ण बातमी…

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *