नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन: 4 दिवसांपूर्वीच बेवारस अवस्थेत आढळले होते; पुण्यात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

पुणे2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. गौतमी पाटील हिच्या वडिलांचं निधन झाले आहे. चार दिवसांपूर्वीच गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात सूरत हायवेवर बेवारस अवस्थेत आढळले होते. त्यांच्यावर धुळ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. रवींद्र पाटील यांचे फोटो सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर गौतमीने आपल्या वडिलांची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर गौतमीने आपल्या वडिलांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचारादरम्यान त्यांचे आज निधन झाले.

सामाजिक कार्यकर्त्याने धुळ्यात केले होते दाखल

रवींद्र पाटील यांना धुळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धुळ्यातील रुग्णालयात दाखल केलं होते. याबाबतची माहिती गौतमीला मिळाल्यानंतर तिने आपल्या वडिलांना पुण्यात नेलं होतं. रवींद्र पाटील यांची धुळ्यात प्रकृती जास्त बिघडली होती. त्यामुळे गौतमीने त्यांना पुण्यात हलवण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत गौतमीने व्हिडीओ जारी करत आपण माणुसकी म्हणून आपल्या वडिलांच्या उपचाराची जबाबदारी घेतल्याचं सांगितलं होतं.

अशी पटली रवींद्र पाटील यांची ओळख
रवींद्र पाटील गेल्या आठवड्यात बेवारस अवस्थेत आढळले होते. धुळ्यात स्वराज्य फाऊंडेशन नावाची संस्था बेवारस व्यक्तींसाठी काम करते. या संस्थेचे दुर्गेश चव्हाण यांना रवींद्र पाटील सुरत बायपास हायवेवर बेवारस अवस्थेत आढळले. चव्हाण यांनी रवींद्र पाटील यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. रवींद्र पाटील यांच्या खिशात आधारकार्ड सापडलं होतं. त्यावर त्यांचं रवींद्र बाबू पाटील असं नाव होतं. तसेच चोपडा तालुक्यातील वेळोदे गावाचा पत्ता होता. त्यांचा फोटो, पत्ता, नाव सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर गौतमीला आपल्या वडिलांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळाली होती.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *