Dasun Shanaka : मला माफ करा… लाजिरवाण्या पराभवानं श्रीलंकेचा कर्णधार इतका खचला की क्रिकेटप्रेमीही भावूक

Dasun Shanaka : एशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवत 8 व्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. भारताने गतविजेत्या श्रीलंकेचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. टॉस जिंकून फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या टीमने 15.2 ओव्हर्समध्ये अवघे 50 रन्स केले. यावेळी गोलंदाज मोहम्मद सिरीजने 6 विकेट्स काढल्या. दरम्यान सामन्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका ( Dasun Shanaka ) ने चाहत्यांची माफी मागितली आहे. 

एशिया कपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. यावेळी सामन्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका ( Dasun Shanaka ) म्हणाला की, टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराजने उत्तम गोलंदाजी केली. मला असं वाटलं की, हे पीच फलंदाजांसाठी चांगलं असेल. हा आमच्यासाठी एक कठीण दिवस होता. आम्ही आमचा खेळ अजून मजबूत करायला हवा होता. 

दसुन शनाका ( Dasun Shanaka ) पुढे म्हणाला की, पराभवानंतर काही चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी आम्हाला समजल्या. सदिरा, कुसल आणि असलंका यांनी चांगली फलंदाजी केली आहे. 

Related News

आमच्यासाठी हा खूप कठीण काळ होता. पण कठीण परिस्थितीवर कशी मात करायची हे आम्हाला माहितीये. चांगल्या टीम्सना पराभूत करून आम्ही अंतिम फेरी गाठलीये. मी आलेल्या चाहत्यांचे आभार मानतो आणि आम्ही त्यांची निराशा केली याबद्दल माफीही मागतो. तरीही समर्थनासाठी धन्यवाद. तर टीम इंडियाचं अभिनंदन.

टीम इंडियाचा श्रीलंकेवर मोठा विजय

टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) कहर केला अन् भारतीय टीमने श्रीलंकेला विरुद्ध दणदणीत विजय मिळवलाय. भारताने आशिया कपच्या फायनल सामन्यात श्रीलंकेचा 10 विकेट्स राखून पराभव केला आहे. टीम इंडिया आता आशियाचा नवा बादशाह झालाय. श्रीलंकेने दिलेल्या अवघ्या 51 रन्सने आव्हान पार करताना टीम इंडियाने एकही विकेट न गमावला सामना जिंकला. 

एशिया कपच्या एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा (Sri Lanka) त्यांच्याच घरात धुव्वा उडवला. एशिया कपच्या इतिहासात टीम इंडियाने (Team India) तब्बल आठव्यांदा एशिया कपवर आपलं नाव कोरलं आहे. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *