deepika padukone
महातंत्र ऑनलाईन डेस्क : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह (Deepika Padukone) यांच्यातील बॉन्डिंग सर्वश्रुत आहे. ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने दीपिका पादुकोणने अशी काही पोस्ट लिहिली की, ती व्हायरल झाली. या पोस्टमध्ये दीपिकाने सांगितलं की, लग्न कुणाशी करायला हवं. दीपिकाच्या या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. रणवीर सिंहने अशी कमेंट केली की, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Deepika Padukone)
दीपिका पादुकोणने इन्स्टाग्रामवर ‘फ्रेंडशिप डे’ दिवशी अशी पोस्ट केली की, जि मिनिटांमध्ये व्हायरल झाली. या पोस्टमध्ये तिने लिहिलं – ‘नेहमी आपल्या ब्रेस्ट फ्रेंडशी लग्न करा. मी ही गोष्ट खूप हलक्यामध्ये सांगत नाहीये. जेव्हा तुमची मैत्री खूप घट्ट असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीसोबत नेहमी खुश राहाल, तर नक्कीच तुम्हाला प्रेम होईल. कोणी असा व्यक्ती ज्याच्यासमोर तुम्ही खूप मोकळ्या मनाने हसू शकाल.कोणताही विचार न करता काहीही सांगू शकाल. ज्याच्या हास्याने तुमचं सगळं दु:ख विसरून जाईल.’
तिने लिहिलं की, आयुष्य खूप लहान आहे. कोणी असे ज्याच्यासमोर तुम्ही मनभरून रडू शकाल आणि तुमची सर्व दु:खे तो समजू शकेल. अशा व्यक्तीला शोधा, ज्याच्यासोबत तुम्ही राहू शकाल, सर्वात महत्त्वाची गोष्ट की, तुम्ही अशा व्यक्तीशी लग्न करा, जो तुमच्या आतील पॅशन, प्रेम आणि वेडेपणा समजू शकेल. असे प्रेमदेखील कधी कमी होत नाही. मग पानी कितीही खोल का असेना आणि कितीही अंधार का असेना.
रणवीर सिंहने केली कॉमेंट
दीपिका पादुकोणने या मोठ्या पोस्टसोबत रणवीर सिंहला टॅग केलं. यानंतर रणवीर सिंहने अशी कमेंट केली की, पाहता पाहता ती व्हायरल होत आहे. या पोस्टवर रणवीर सिंहने हार्ट इमोजी शेअर केलीय.