Demat Account: डीमॅटबाबत निकष बदलणार? सुरक्षिततेवर भर; फसवणूक रोखण्यासाठी उपाययोजना करणार | महातंत्र








मुंबई ; महातंत्र वृत्तसेवा: बाजार नियामक सेबी गुंतवणूकदारांना मोठी सुविधा देण्याची तयारी करत आहे. मार्केट रेग्युलेटर डीमॅट खात्याच्या निष्क्रियतेचे निकष बदलण्याचा विचार करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संदर्भात नवीन प्रस्ताव आणले जाऊ शकतात. या शिवाय सेबी डिमॅट खात्यांमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी उपायांवरही विचार करत आहे. सेबी डिमॅट खात्यांच्या निष्क्रियतेवर नवीन नियम आणण्याचा प्रस्ताव देत आहे. (Demat Account)

सर्व एक्सचेंज आणि डिपॉझिटरीजमध्ये एकसमान नियम करण्याची तयारी सुरू आहे. नवीन प्रस्तावानुसार ६ ऐवजी १२ महिने कोणतेही व्यवहार न झाल्यास डिमॅट खाते निष्क्रिय मानले जाईल. याशिवाय एसआयपी, राइट इश्यू इत्यादीसाठी अर्ज दिल्यास राइट इश्यू इत्यादीसाठी अर्ज दिल्यास खाते सक्रिय मानले जाईल. तथापि, बोनस, स्टॉक स्प्लिट इत्यादी सक्रियतेसाठी वैध असणार नाहीत.
सध्याच्या नियमांनुसार ६ महिन्यांपर्यंत डेबिट व्यवहार न झाल्यास खाते निष्क्रिय होते. (Demat Account)

डिमॅट खाती अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन उपाय देखील केले जातील.

निष्क्रिय खात्यांच्या डिलिव्हरी सूचना स्लिप पत्त्यावर पाठवल्या जातील.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच डीआयएस पाठवला जाईल.

डिमॅट खात्यांमधून एकरकमी हस्तांतरणाच्या विनंतीवर दुहेरी पडताळणी केली जाईल.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *