डिओड्रंटचा इतका मोठा स्फोट की शेजारच्या घरातील काचा फुटल्या, नाशकातील धक्कादायक घटना

Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका घरात डिओडरंटचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की यामुळे शेजारच्यांच्या घरातील काचा फुटल्या. एवढंच नव्हे तर घराबाहेरील गाड्यांच्याही काचा फुटल्या. नेमकी कशी घडली ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

मोबाईल, डिओड्रंट या वस्तू आपल्या बेडरुममध्ये हमखास आढळतात. पण या वस्तू एकमेकांच्या संपर्कात आल्यास मोठा स्फोट होऊ शकेल, याचा विचारही आपण केला नसेल. नाशकात घडलेल्या घटनेत एका कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. 

डीओड्रंटच्या बाजूला काही कॉस्मेटिक्स आणि मोबाईल चार्जिंग साठी ठेवला होता. मोबाईल चार्जिंगच्या उष्णतेने डिओड्रंटचा मोठा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत एकाची तब्येत गंभीर आहे तर इतर दोघा जखमींना खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

Related News

या स्फोटामुळे मोठी आग भडकून घराचे नुकसान झाले. तसेच  घरातील काही साहित्य जळून खाक झाले. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, यामुळे घराबाहेरील गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. तसेच आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या. त्यामुळे परिसरात काहीशी घबराट देखील पसरली.

या घटनेतील तुषार जगताप, शोभा जगताप, बाळकृष्ण सुतार असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. घटनेनंतर अंबड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून स्फोट नेमका का ? आणि कसा झाला? याचा अधिक तपास करत आहे.

शिर्डीत पतीकडून पत्नी, मेहुण्यासह आजे सासूची हत्या

तिहेरी हत्याकांडाने अहमदनगर (Ahmednagar Crime) जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. जावयाने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार शिर्डीत (Shirdi) घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Ahmednagar Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. दरम्यान तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला नाशिकमधून अटक केली आहे.

शिर्डीजवळील सावळीविहीर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने धारदार शस्राने वार करत तिघांची निर्घृण हत्या केली आहे. तर सासू, सासरे आणि मेव्हणी यांच्यावरही हल्ला करुन आरोपीने त्यांना गंभीर जखमी केले आहे. जखमींवर शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जावई सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिर्डी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनं सावळीविहीर गावात खळबळ उडाली आहे.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *