यांची राजकीय दुकानं बंद होतील म्हणून एकत्र!: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांवर घणाघात

मुंबई39 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

आज मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीवर भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, केवळ मोदीजी हटाव एवढा एकमेव अजेंडा घेऊन हे सर्व पक्ष एकत्र आले आहेत. मात्र अशा प्रकारचा अजेंडा कुणी कितीही आणला तरीही लोकांच्या मनात जोपर्यंत मोदीजी आहेत. तोपर्यंत 36 काय 100 पक्ष एकत्र आले तरीही लोकांच्या मनातून ते मोदींना काढू शकत नाहीत.

Related News

दुकानं बंद होतील म्हणून हे सगळे एकत्र
फडणवीस पुढे म्हणाले की, शेवटी मोदीजी लोकांच्या मनात, त्यांच्या कार्यामुळे, नेतृत्वामुळे आणि देशाला प्रगतीपथावर नेल्यामुळे आहेत. गरीब कल्याणाचा अजेंडा त्यांनी राबवला त्यामुळेच मोदीजी सामान्यांच्या मनात आहेत. आपला विचार न करता सर्वस्व देशाला देण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे आणि करत आहेत. त्यामुळे मोदीजी लोकांच्या मनात आहेत. या ठिकाणी जे पक्ष इंडिया आघाडीत एकत्र आले आहेत ते काही देशाचा विचार करुन नाही तर आपली राजकारणातली दुकानं बंद होत आहेत. ही दुकानं कशी वाचवायची यासाठी हे सगळे एकत्र आले आहेत.

आजच 5 पक्षांनी PM पदाचा दावा ठोकला
आजच पाच पार्ट्यांनी पंतप्रधान पदावर दावा ठोकला आहे. इंडियाचे पक्ष पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवू शकत नाहीत. यांनी ठरवला तरीही तो जनतेला पटला पाहिजे. यांचा कुठलाही उमेदवार जनतेलाही पटत नाही. बॅनरबाजी करुन, एकत्र येऊन आणि घोषणाबाजी करुन आपला टाइमपास ते करत आहेत. मात्र त्याचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *